पुणे शहरातली 163 नगरसेवकांसाठी 35 लाख मतदार मतदान करणार आहे (फोटो - सोशल मीडिया)
165 नगरसेवकांनासाठी ही निवडणूक होणार होती परंतु दोन नगरसेवक बिनविरोध झाल्याने 163 नगरसेवकांच्या निवडीसाठीची प्रक्रिया पार पडत आहे. 35 लाख मतदार आपल्या प्रभागांचे नवे कारभारी निवडणार आहेत. एक दिवसाचा मतदार राजा आपले बहुमूल्य मत कुणाच्या पदरात टाकतोय याबाबत कमालीची उत्सुकता लागली आहे. पुणे महानगरपालिका हद्दीत 4011 मतदान केंद्रामध्ये ही प्रक्रिया पार पडत आहे. 35 लाख 1854 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान केंद्राची पाहणी करण्यापासून कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे.
हे देखील वाचा : एकाच वेळी चार उमेदवारांना कसे करावे मतदान? मतदान प्रक्रिया जाणून घ्या एकाच क्लिकवर
मतदान केंद्रांवर 25,899 एवढे कर्मचारी आहेत. तर 454 क्षेत्रीय अधिकारी तसेच 32 नोडल अधिकारी आणि नोडल अधिनस्त कर्मचारी 2400 आहेत , बाराशे आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मतमोजणीसाठी 1062 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
या निवडणुकीत उमेदवाराकडून सोशल मीडियाचा सर्रासपणे वापर करण्यात आला. मतदारांपर्यंत थेट पोहोचता आले नाही तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवारांनी केल्याचे दिसून आले. शहरात रात्रीपर्यंत छुप्या पद्धतीने उमेदवारांचा प्रचार सुरू होता. सोशल मीडियावरील प्रचारावर निवडणूक तसेच पोलीस यंत्रणा ही लक्ष ठेवून आहेत.
हे देखील वाचा : दुबार मतदार सापडला तर त्याला तिथेच ठोका…! ठाकरे बंधूंनी आदेश दिल्याचे संजय राऊतांची कबुली
मतदाराची ओळख पटविण्याकरिता मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त पुढील १२ पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत.
१. भारताचा पासपोर्ट
२. आधार ओळखपत्र
३. वाहन चालवण्याचा परवाना
४. आयकर विभागाकडील ओळखपत्र
५. केंद्रशासन / राज्यशासन / सार्वजनिक उपक्रम / स्थानिक स्वराज्य संस्था यानी आपल्या कर्मचाऱ्याना फोटोसहीत दिलेली ओळखपत्रे
६. राष्ट्रीयकृत बँका अथवा पोस्ट ऑफिस यामधील खातेदाराचे फोटो असणारे पासबुक
७. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला फोटोसहीत अपंगत्वाचा दाखला
८. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील, फोटो असलेले ओळखपत्र (MNREGA ऑव कार्ड)
९. निवृत्त कर्मचाऱ्याऱ्यांची अथवा त्यांच्या विधवा / अवलचित व्यक्ती यांची फोटो असलेली निवृत्ती वेतन विषयक कागदपत्रे उदा. पासबुक, प्रमाणपत्र इ.
१०. लोकसभा / राज्यसभा सचिवालय तसेच विधानसभा /विधानपरिषद सचिवालय गांनी आपल्या सदस्याना दिलेली अधिकृत ओळखपत्र
११. स्वातंत्र्य सैनिकाचे फोटो असलेले ओळखपत्र
१२. केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे फोटोसहीत कार्ड






