Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Politics: पुणे महापालिकेत रस्ते आणि वाहतूक कोंडीवरून राडा; ‘PMPML’ भ्रष्टाचारावरून काँग्रेस आक्रमक

शिवणे-खराडी रस्त्यास प्राधान्य दिले असून, जागा संपादन प्रक्रियेला गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जागा ताब्यात घेण्यात नागरिकांकडून कागदपत्रांचा विलंब, मोबदल्यावरील वाद आणि टीडीआर प्रक्रियेत उशीर ही अडचणी मान्य केल्या.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 19, 2026 | 12:51 PM
PMC Politics, PMC Missing Links Project, Pune Traffic,

PMC Politics, PMC Missing Links Project, Pune Traffic,

Follow Us
Close
Follow Us:
  • पीएमपीएलच्या कारभारावरून महापालिकेच्या बुधवारच्या सर्वसाधारण सभेत जोरदार खडाजंगी
  • शहरातील वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या रस्ते जाळ्याचा मुद्द्यावरू काँग्रेस आक्रमक
  • डीपी रस्ते आणि टीडीआर प्रक्रियेवरूनही सदस्य आक्रमक
Pune Politics: शहरातील वाहतूक कोंडी, रखडलेले डीपी रस्ते, टीडीआर प्रक्रियेतील विलंब आणि पीएमपीएलच्या कारभारावरून महापालिकेच्या बुधवारच्या सर्वसाधारण सभेत जोरदार खडाजंगी झाली. प्रशासनाने यावर्षी १२ मिसींग लिंकचे काम पूर्ण केले जाईल, तसेच समाविष्ट गावांतील प्रत्येकी एक मुख्य रस्त्याचे काम प्राधान्याने पुर्ण केले जाईल असे आश्वासन सभागृहात झालेल्या जोरदार चर्चेनंतर दिले. सभेच्या सुरुवातीलाच पीएमपीएलच्या कथित भ्रष्ट कारभाराविरोधात काँग्रेस सदस्यांनी आंदोलन करत निषेध नोंदवला. यावर महापौर मंजुषा नागपुरे यांनी पीएमपीएल संदर्भात लवकरच विशेष सभा घेण्यात येईल, असे स्पष्ट केले.

शहरातील वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या रस्ते जाळ्याचा मुद्दा सर्वाधिक गाजला. नगरसेवक हरिदास चरवड यांनी नवले पूल परिसरातील वारंवार होणाऱ्या अपघातांकडे लक्ष वेधत, आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार? असा सवाल उपस्थित केला. सुहास टिंगरे यांनी लोहगाव-धानोरी रस्त्यावरील कोंडीमुळे नागरिकांना दोन-दोन तास अडकून पडावे लागत असल्याचे सांगितले. निवृत्ती बांदल यांनीही प्रशासनावर टीका केली.

रेल्वेचे मोठे नियोजन जाहीर! मुंबई लोकलसाठी 3000 कोटींचा आधार; स्वयंचलित दरवाज्यांच्या नव्या गाड्या लवकरच

नवले पूल अपघातांविषयी संताप

डीपी रस्ते आणि टीडीआर प्रक्रियेवरूनही सदस्य आक्रमक झाले. प्रशांत जगताप, नीलेश निकम आणि स्वप्निल दुधाने यांनी टीडीआर प्रक्रिया अत्यंत किचकट आणि वेळखाऊ असल्याचा आरोप केला.

चार-चार वर्षे टीडीआरसाठी हेलपाटे मारावे लागतात, मग नागरिक रस्त्यासाठी जमीन का देतील? असा सवाल त्यांनी केला.

टीडीआर प्रक्रिया ऑनलाइन करण्याची मागणीही राजाभाऊ बराटे यांनी केली.

सचिन दोडके यांनी प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे डीपी रस्ते रखडल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

सायली वांजळे यांनी स्थळ पाहणी न करता डीपी आराखडे तयार केले जात असल्याने प्रत्यक्षात अंमलबजावणी अडखळत असल्याचे नमूद केले.

प्रिया गदादे यांनी जनता वसाहतीतील एकाच रस्त्यावरचा वाढता ताण लक्षात घेऊन पर्यायी मार्गाची गरज अधोरेखित केली.

अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

काका चव्हाण, अनिता इंगळे, गौरव घुले, अतूल तरवडे, अरुण राजवाडे, प्रतिभा चोरघे, धनश्री कोल्हे आदीनी त्यांच्या भागातील रस्त्यांच्या विकास कामासंदर्भातील प्रश्न मांडले, यासंदर्भात शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी खुलासा केला. ते म्हणाले, शहरात सध्या केवळ ९ टक्के रस्ते उपलब्ध असून, ते १५ टक्क्यापर्यंत वाढविणे गरजेचे आहे. दररोज १२०० ते १३०० वाहनांची भर पडत असल्याने रस्ते विकासावर भर देणे अपरिहार्य बनले आहे.

UPI Payment Complaint Number: चुकीच्या क्रमांकावर झाले UPI payment? घाबरू नका,

 

टीडीआर प्रक्रिया ९० दिवसांत

टीडीआर प्रक्रिया ९० दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून आवश्यक कागदपत्रे पूर्ण असल्यास विलंब होणार नाही,असे पावसकर यांनी स्पष्ट केले, लोहगाव धानोरी रस्ता सीएसआरच्या माध्यमातून विकसित करण्याचा प्रस्ताव असून, पुणे-नगर रस्त्यावरील कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक विभागासोबत समन्वय सुरू असल्याचेही त्यानी सांगितले.

शिवणे-खराडी रस्त्यास प्राधान्य दिले असून, जागा संपादन प्रक्रियेला गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जागा ताब्यात घेण्यात नागरिकांकडून कागदपत्रांचा विलंब, मोबदल्यावरील वाद आणि टीडीआर प्रक्रियेत उशीर ही अडचणी मान्य केल्या आहेत. टीडीआर प्रक्रिया ९० दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले, काही भागांमध्ये अतिक्रमण आणि वन, पाटबंधारे परवानग्या न मिळाल्याने कामे ठप्प आहेत.

महत्त्वाचे मुद्दे
शहरात केवळ ९ टक्के रस्ते
१५ टक्क्यांपर्यंत वाढवणे आवश्यक
दररोज १२०० वाहनांची पडते भर
शहरात मिसिंग लिंक
फक्त १२ मिसिंगा लिंकवर काम सुरू
नव्या वर्षात आणखी १२ मिसिंग लिंकवर काम

 

Web Title: Pmpml under fire protests over corruption and safety concerns at navale bridge in pmc meet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 12:51 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.