Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमरावती जिल्ह्यात पोलिसांचा हाय अलर्ट ! दहशतवादी संघटनेतर्फे कोल्हे हत्याकांडाचा उल्लेख  

दहशतवादी संघटनेने दिल्लीत बॉम्बस्फोट हल्ल्याची धमकी दिल्यामुळे देशभरातील पोलीस यंत्रणा अलर्ट आहे. त्यातच दहशतवादी संघटनेने उदयपूरसह अमरावतीमधील कोल्हे हत्याकांडाचाही उल्लेख केला आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये दहशतवादी किंवा अन्य गुन्हेगारी कारवाया होण्याची शक्यता पाहता केंद्रीय गृहविभागाकडून अमरावती जिल्हा पोलीस प्रशासनाला सतर्क करण्यात आले आहे.

  • By Anjali Awari
Updated On: Aug 11, 2022 | 01:37 PM
अमरावती जिल्ह्यात पोलिसांचा हाय अलर्ट ! दहशतवादी संघटनेतर्फे कोल्हे हत्याकांडाचा उल्लेख  
Follow Us
Close
Follow Us:

अमरावती : देशाबरोबरच जिल्ह्यात १५ ऑगस्ट (August 15 ) रोजी स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव (75th Amrit Mahotsav of Independence) साजरा होत आहे. अमरावतीतही अमृत महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. अशातच दहशतवादी संघटनेने दिल्लीत बॉम्बस्फोट हल्ल्याची धमकी (Bomb attack threat in Delhi) दिल्यामुळे देशभरातील पोलिस यंत्रणा अलर्ट (Police system alert )आहे. त्यातच दहशतवादी संघटनेने उदयपूरसह अमरावतीमधील कोल्हे हत्याकांडाचाही (kolhe murder case in Amravati) उल्लेख केला आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये दहशतवादी किंवा अन्य गुन्हेगारी कारवाया होण्याची शक्यता पाहता केंद्रीय गृहविभागाकडून (Central Home Department) अमरावती जिल्हा पोलीस प्रशासनाला सतर्क करण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे.

चोविस तास पोलिसांचा पहारा

भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या स्मरणार्थ २०२२ चा स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सव म्हणून साजरा केला जाईल. अमरावतीसह देशभरात १३ ऑगस्टपासून अमृत महोत्सवाला सुरुवात होणार आहे. १५ ऑगस्टपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे तीन दिवस हाय अलर्टवर (Three days on high alert) राहणार आहे. तीन दिवस पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहरातील १० तर ग्रामीण भागातील ३४ पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस २४ तास सतर्क राहणार आहेत. बंदोबस्ताबाबत अतिरिक्त पोलिस बंदोबस्ताचीही मदत घेतली जाणार आहे.

वरिष्ठांना क्षणोक्षणी द्यावी लागणार माहिती

विशेष पोलीस उपमहानिरीक्षक, पोलीस आयुक्त आणि पाच जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक यांनी बंदोबस्ताचे नियोजन केले असून, त्यांनी अधिनस्त यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलीस बंदोबस्तातील प्रत्येक घडामोडी व माहिती क्षणोक्षणी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावी लागणार आहे. तसेच जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त हे सुध्दा परिस्थितीतील लक्ष ठेवणार आहे. सर्व उच्च अधिकारी बंदोबस्तात तैनात असतील.

सार्वजनिक ठिकाणांची कडक तपासणी

संवेदनशील परिस्थितीमुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रत्येक घडामोडीवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. तीन दिवसीय अमृत महोत्सवासाठी शहर व ग्रामीण भागातील सर्व उड्डाण पूल, रेल्वे स्थानक, बसस्थानक, शासकीय कार्यालये, क्रीडा संकुल, शाळा, धार्मिक स्थळे, सिनेमा हॉल, मॉल्सची तपासणी करावी लागणार आहे. त्यासाठी विशेष शाखा विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि क्यूआरटी यांच्यासह डॉग स्कॉड, बीडीएस टीम, ईटीसी आणि विशेषत: गोपनीय विभागानेही चौकशी सुरू केली आहे.

बड्या नेत्यांसह महत्त्वाच्या ठिकाणांवर लक्ष

नुपूर शर्माच्या पोस्टला (Posts by Nupur Sharma) समर्थन दिल्यामुळे उमेश कोल्हेंची हत्या (Murder of Umesh Kolhe) करण्यात आली. तसेच अनेकांना धमक्या सुध्दा देण्यात आल्या. या प्रकरणाच्या अनुषंगाने दोन्ही समाजातील काही नेते आणि अधिकारी चर्चेत आले आहेत. अलीकडेच खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana ) यांनीही सावध राहण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे काही नेत्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्य आणि आरोपांबाबतही अडचणी नाकारता येत नाहीत. त्यामुळे बड्या नेत्यांवर आणि महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांची विशेष नजर राहणार आहे.

Web Title: Police high alert in amravati district mention of kolhe murder case in by terrorist organization nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2022 | 01:37 PM

Topics:  

  • amaravati news
  • mp navneet rana
  • navarashtra news

संबंधित बातम्या

Top Marathi News Today Updates : गोंदियात छगन भुजबळांचा ध्वजारोहणास नकार; प्रकृतीचे दिले कारण
1

Top Marathi News Today Updates : गोंदियात छगन भुजबळांचा ध्वजारोहणास नकार; प्रकृतीचे दिले कारण

Top Marathi News Today : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
2

Top Marathi News Today : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

सततच्या कटकटीला कंटाळला, लाईट गेली म्हणून थेट वीज विभागाच्या कार्यालयालाच लावली आग; धक्कादायक Video Viral
3

सततच्या कटकटीला कंटाळला, लाईट गेली म्हणून थेट वीज विभागाच्या कार्यालयालाच लावली आग; धक्कादायक Video Viral

World Hypertension Day: मुलांमध्ये वाढत्या उच्च रक्तदाबाचे संकट गंभीर
4

World Hypertension Day: मुलांमध्ये वाढत्या उच्च रक्तदाबाचे संकट गंभीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.