मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) अध्यक्षपदावर झालेल्या नाट्यमय घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी IAS अधिकारी संजय सेठी यांची MSRTC अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. 6 फेब्रुवारी रोजी या नियुक्तीचा अधिकृत राजपत्र आदेशही जारी करण्यात आला होता.
मात्र, अवघ्या काही तासांतच सूत्रं फिरली आणि MSRTC अध्यक्षपद पुन्हा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सोपवण्यात आलं. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी रात्री उशिरा सरनाईकांच्या नियुक्ती पत्रावर सही केल्याची माहिती समोर आली आहे. या नाट्यमय बदलामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील दुरावा दूर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
2014 पासून MSRTC अध्यक्षपद हे परिवहन मंत्र्यांकडेच होते. मात्र, विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शिंदे गटातील मंत्रिपदावरील नाराजी दूर करण्यासाठी भरत गोगावले यांना अध्यक्षपद देण्याचा निर्णय घेतला. मात्र, सध्या गोगावले यांच्याकडे रोजगार हमी विभागाचे मंत्रीपद आल्याने MSRTC अध्यक्षपद शिंदे गटाच्या प्रताप सरनाईक यांच्याकडे सोपवण्यात आले.
मात्र, दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रताप सरनाईकांना धक्का देत आयएएस अधिकारी संजय सेठी यांची MSRTC अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. यासंदर्भातील अधिकृत आदेश 6 फेब्रुवारी रोजी राजपत्राद्वारे जाहीर करण्यात आला होता. मात्र, या निर्णयाला अवघ्या काही तासांतच कलाटणी मिळाली आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी रात्री उशिरा प्रताप सरनाईक यांच्या MSRTC अध्यक्षपदाच्या नियुक्ती पत्रावर सह्या केल्याची माहिती समोर आली आहे. या नाट्यमय बदलामुळे MSRTC अध्यक्षपद पुन्हा प्रताप सरनाईकांकडे आले असून, फडणवीस-शिंदे गटातील तणाव निवळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
‘…तर मालमत्ता सील करणार’; बारामती नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचा थकबाकीदारांना इशारा
राज्यातील लाखो नागरिक सार्वजनिक वाहतुकीसाठी एसटी बसवर अवलंबून आहेत, मात्र महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (MSRTC) सध्या आर्थिक तोटा, जुन्या बसच्या देखभालीची समस्या, कर्मचारी संप आणि प्रवासी संख्येत घट यांसारख्या गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे.
MSRTC च्या वाढत्या तोट्याच्या पार्श्वभूमीवर महामंडळाने मागील महिन्यात 15 टक्के भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे आर्थिक तोटा काही प्रमाणात भरून निघेल, असा अंदाज असला तरी, वाढलेल्या तिकिटदरांमुळे प्रवाशांमध्ये नाराजी वाढली आहे.
उन्हाळ्यात ‘या’ लोकांनी चुकूनही करू नये उसाच्या रसाचे सेवन, अन्यथा शरीरावर होतील गंभीर दुष्परिणाम
पुण्यातील स्वारगेट बसस्थानक परिसरात घडलेल्या अत्याचार प्रकरणानंतर राज्यभरातील बस स्थानकांवरील निर्लेखित (कंडम) बसेस आणि महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
बसस्थानक परिसरात दुर्लक्षित अवस्थेत पडलेल्या जुन्या बसेस अवैध कृत्यांचे अड्डे बनत असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर, महामंडळाने अशा बसेस तातडीने विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले आहेत. भविष्यात कोणत्याही बसस्थानक परिसरात निर्लेखित बसेस उभ्या राहू नयेत, असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
महिला सुरक्षेसाठी तातडीच्या उपाययोजना राबवण्याचे आदेश
निर्लेखित बसेस त्वरित हटवण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश
आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी महामंडळाच्या नव्या धोरणांची अपेक्षा
राज्यातील एसटी सेवेला सुदृढ करण्यासाठी आणि प्रवाशांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी महामंडळाने तातडीने सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. आर्थिक स्थैर्य, महिला सुरक्षेसाठी अधिक चोख उपाय आणि बसस्थानकांची स्वच्छता व सुविधा सुधारण्यावर भर दिल्यास महामंडळाची गळती थांबवून प्रवाशांची संख्या वाढवता येईल, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.