Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बँक घोटाळा प्रकरणी न्यायदेवतेवर विश्वास व्यक्त करत प्रविण दरेकरांनी ‘या’ तिघांवर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याची केली घोषणा

बँक घोटाळा प्रकरणी न्यायालयात सुनावणी होईल, त्या वेळी न्यायदेवता मला निश्चितपणे न्याय देईल यावर माझा पूर्ण विश्वास आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केले.

  • By साधना
Updated On: Mar 29, 2022 | 08:24 PM
बँक घोटाळा प्रकरणी न्यायदेवतेवर विश्वास व्यक्त करत प्रविण दरेकरांनी ‘या’ तिघांवर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याची केली घोषणा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) १५ दिवसांचा दिलासा मला दिला आहे. मला न्यायदेवतेवर पूर्णपणे विश्वास आहे. कारण ही केस जबरदस्तीने पोलिसांवर दबाव आणून राज्य सरकारने(Bank Fraud Case) बनवली आहे. त्यामुळे न्यायालयात सुनावणी होईल, त्या वेळी न्यायदेवता मला निश्चितपणे न्याय देईल यावर माझा पूर्ण विश्वास आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केले.

आज विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात सुनावणी होती,त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, मला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. न्यायदेवता मला न्याय देईल. सत्र न्यायालयात मला तीनदा दिलासा मिळाला. शेवटी जामीन फेटाळला गेला. महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखालील नेत्यांनी हा जो संकल्प मांडलाय त्याचे कारण त्यांचे काही नेते तुरुंगात आहेत, काही जाण्याच्या मार्गावर आहेत, असे असताना आपणही क्रियेला प्रतिक्रिया दिली पाहिजे. मग भाजपचा कुठला नेता आपल्याला अडकवता येतोय का ? गिरीश महाजन यांच्या बाबतीत षड्यंत्र केले. मोहित कुंबोज, प्रसाद लाड यांच्या बाबतीत गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु आम्ही चिंता करत नाही. जर चुकीचे सांगितले असेल, तर तपास यंत्रणा तपास करून कारवाई करेल आणि न्यायालय उचित असा न्याय देत असते. त्यामुळे आम्ही सरकारच्या कुठल्याही दबावाला, दंडेलशाहिला दबणार नाही. जी प्रक्रिया असेल, त्या प्रक्रियेला सामोरे जाऊ आणि या सरकरविरोधात असलेला आवाज दाखवून देऊ, असे दरेकर यांनी सांगितले.

तिघांविरोधात अब्रूनुकसानीदा दावा
ते पुढे म्हणाले ज्या बँकेचा नफाच १५-१६ कोटी आहे, तिचा घोटाळा २ हजार कोटींचा होणार कसा ?, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित करतानाच ज्यांनी अशा प्रकारचे बेताल आरोप केले, ते धनंजय शिंदे असतील, नाना पटोले असतील, किंवा भाई जगताप असतील, यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा यथावकाश करणार आहे, असे सांगितले.  मुंबई बँकेचा २००० कोटींचा घोटाळा झाला, असा आरोप केला जात आहे, त्यावर प्रसारमध्यमांशी विरोधी पक्षनेते दरेकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, नाना पाटोलेही बोलतात २ हजार कोटींचा घोटाळा झाला. मला यावर हसायला येते. धनंजय मुंडे जे आपचे आहेत, त्यांनी आपली प्रतिमा बेजबाबदार बनवली आहे, असेही दरेकर यांनी सांगितले.

Web Title: Pravin darekar comment on mumbai bank fraud case nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2022 | 08:23 PM

Topics:  

  • Mumbai Bank

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.