साडेचार कोटींचे प्राथमिक आरोग्य केंद्र धूळखात
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील रांझणी येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आयुष्यमान आरोग्य मंदिर प्राथमिक आरोग्य केंद्र व पशू वैद्यकीय दवाखान्याची ४ कोटी ५४ लाखांचा निधी खर्च करून इमारत बांधण्यात आली. या इमारतीचे लोकार्पण होऊन १८ महिने उलटले; परंतु याठिकाणी सेवा देण्यासाठी डॉक्टर, कर्मचाऱ्यांची नेमणूक न झाल्याने इमारतीसह मशिनरी धूळखात पडली आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Political : रायगड जिल्हा राष्ट्रवादीची धुरा सुधाकर घारेंच्या हाती, शिंदेंच्या विरोधात सुनील तटकरेंची मोठी खेळी
प्राथमिक आरोग्य केंद्र व पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीचा लोकार्पण सोहळा २३ फेब्रुवारी २०२४ रोजी झाला; परंतु गेल्या १८ महिन्यांपासून डॉक्टर, मेडिकल ऑफिसर, औषध निर्माता, सेवक, परिचारिका, कर्मचारी यांची नेमणूक केली नसल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत धूळखात पडली आहे. वैद्यकीय अधिकारी गट-अ २ दोन पदे भरण्यात आली आहेत. यामध्ये रिक्त एक आरोग्य सहायक, दोन सहाय्यक परिचारिका प्रसविका, ३ नियमित पदे भरण्यात येणार आहेत. औषध निर्माता १, बाह्रायंत्रणेव्दारे (कंत्राटी) २, कनिष्ठ लिपिक १, बाह्ययंत्रणेव्दारे (कंत्राटी) ३, प्रयोगशाळा तंत्रज्ञ १, ही पदे महाराष्ट्र राज्य शासनाकडून भरण्यात येणार आहेत.
बाह्ययंत्रणेव्दारे भरण्यात येणारी पदे
बाह्ययंत्रणेव्दारे (कंत्राटी) पद्धतीने आरोग्य सहायक, १ बाह्ययंत्रणेव्दारे (कंत्राटी) ५ स्त्री परिचर, १ ७, बाह्रायंत्रणेव्दारे (कंत्राटी) ६, पुरुष परिचर बाह्ययत्रणेव्दार (कंत्राटी) वाहनचालक गट क. १ बाह्ययंत्रणेव्दारे (कंत्राटी) ८, सफाईगार गट-ड १ बाह्ययंत्रणेव्दारे (कंत्राटी) एकूण मंजूर कंत्राटी पदे (१०) रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
रिक्त पदे भरून आरोग्य केंद्र सुरु करणार
पंढरपूर तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती सोलापूर, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या वतीने सहसंचालक, आरोग्य सेवा प्राथमिक केंद्र, आरोग्य भवन, मुंबई यांच्याकडे प्रस्ताव पाठविला आहे. तेथून मंजुरी मिळाल्यानंतर पदे भरून प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केले जाईल. सध्या दोन वैद्यकीय अधिकारी गट अ पदे भरण्यात आली आहेत.
– डॉ. एकनाथ बोधले, तालुका आरोग्य अधिकारी, पंढरपूर.
हेदेखील वाचा : Konkan News : कोकणवासियांसाठी खूशखबर, गणेशोत्सवानिमित्ताने दादर ते कुडाळ मार्गावर धावणार “शिवसेना एक्स्प्रेस”, काय आहे तिकीट दर?