PM Narendra Modi in Solapur : लोकसभेचे बिगूल वाजले आणि प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात 4 सभा आहेत. सोलापुरातील महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान सोलापुरात आले होते. यावेळी त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढवत, कॉंग्रेस त्यांच्या प्रचारात चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत, असा घणाघाती आरोप केला. परंतु, आम्ही या देशातील एसटी, एनटी, ओबीसी यांना मिळालेले आरक्षण आम्ही टिकवूच त्याचबरोबर मोठे बळ देऊ, त्यांच्यासाठीच आमच्या सर्वाधिक योजना आहेत.
#WATCH | During a public gathering in Solapur, Maharashtra, Prime Minister Narendra Modi says "…Congress and INDI alliance are spreading false news that we will change the Constitution and finish Reservation. I have said before that even if Babasaheb Ambedkar wanted to end… pic.twitter.com/4XDOdBPKOq
— ANI (@ANI) April 29, 2024
आमच्या पक्षातच सर्वाधित उमेदवार हे ओबीसी, एसटी, एनटी समाजाचे आहेत. आम्हाला या समाजाचा विकास करायचा आहे म्हणूनच आम्ही या देशाचा राष्ट्रपतीसुद्धा मागास आदिवासी समाजातील केला. यांना दरवर्षाला एक पंतप्रधान देण्याचे राजकारण सुरू आहे. हे पाच वर्षाला 5 पंतप्रधान देणार आहेत. मग अशा लोकांच्या हातात तुम्ही देश देणार आहात.
कॉंग्रेसच्या 60 वर्षाचा कार्यकाळ तुम्ही बघितला आहे. त्याचबरोबर आमचा 10 वर्षांचा सेवाकाळ बघितला आहे. कॉंग्रेसने एसटी, एनटी, ओबीसी यांचे सर्व हक्क रोखण्याचा प्रयत्न केला. या मागे त्यांचे षडयंत्र होते, हे आमचे आश्रित राहिले पाहिजेत मग यांचा वापर व्होटींगसाठी करता येईल.
मला गरीब घरातील मुलाला डॉक्टर, इंजिनिअर, कॉम्प्युटर इंजिनिअर बनवयाचे आहे. त्याकरिता त्यांना लागत असलेल्या योजना, आरक्षण देण्यासाठी आम्ही तयार आहोत. आमच्याकडे पाहिजे तेवढे मतदान आहे. परंतु, आरक्षणाला आम्ही धक्का लावूच शकत नाही. यामुळे आरक्षणाला जेवढी ताकद देण्याची गरज आहे तेवढी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत मी स्वतः कटिबद्ध आहे.