Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Drought: डिंभे उजव्या कालव्याला तातडीने पाणी सोडा; ४५ गावांतील शेतकऱ्यांची आर्त हाक

Maharashtra Drought: पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे शेतातील उभी पिके डोळ्यांदेखत करपू लागली आहेत. पिकांना वाचवण्यासाठी शेतकरी पाण्याच्या शोधात धावपळ करत असून, वेळेत पाणी न मिळाल्यास हाती आलेले पीक वाया जाण्याची दाट भीती निर्माण झाली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 22, 2026 | 05:55 PM
Shirur, Pune News, Agriculture News, Dimbhe Dam, Water Crisis,

Shirur, Pune News, Agriculture News, Dimbhe Dam, Water Crisis,

Follow Us
Follow Us:
  • पावसाअभावी शेती पिकांना मोठा फटका
  • डिंभे उजव्या कालव्याला तातडीने पाणी सोडण्यात यावे,
  • अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी वणवण
Maharashtra Drought: आंबेगाव तालुक्यातील हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे उजव्या कालव्याला तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी आक्रमक मागणी आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील ४५ गावांतील शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे. पावसाअभावी परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पाण्याची टंचाई दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, तर विहिरी, कूपनलिका आणि पाझर तलाव कोरडे पडू लागल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

Maharashtra Government : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 7/12 वरील जमीन हिस्सा विक्रीसाठी नवा नियम, फडणवीस सरकार

शेती पिकांना मोठा फटका; पाण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ

पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे शेतातील उभी पिके डोळ्यांदेखत करपू लागली आहेत. पिकांना वाचवण्यासाठी शेतकरी पाण्याच्या शोधात धावपळ करत असून, वेळेत पाणी न मिळाल्यास हाती आलेले पीक वाया जाण्याची दाट भीती निर्माण झाली आहे. शेतीच्या पाण्याचा प्रश्न तर गंभीर झालाच आहे, शिवाय पाळीव जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्नही बिकट झाल्याने ग्रामीण भागात चिंता व्यक्त केली जात आहे. डिंभे उजव्या कालव्याला त्वरित पाणी सोडल्यास या भागातील विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन शेतीला मोठा दिलासा मिळेल, तसेच गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही तात्पुरता सुटण्यास मदत होईल.

दिलीप वळसे पाटील यांची शिष्टमंडळ भेट घेणार

परिसरातील परिस्थिती अत्यंत नाजूक बनली असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर, डिंभे उजव्या कालव्यातून तातडीने आवर्तन सोडण्यासाठी शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ लवकरच माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन निवेदन देणार आहे, अशी माहिती पंचायत समिती सदस्य निलेश टेमकर यांनी दिली. वाढत्या टंचाईची तीव्रता ओळखून पाटबंधारे विभागाने विलंब न करता कालव्याला पाणी सोडावे, अशी एकमुखी मागणी दोन्ही तालुक्यांतील ग्रामस्थ करत आहेत.

Pune Drunk and Drive: दारूच्या नशेत भरधाव कार थेट बंगल्याच्या गेटवर; गेट तोडून डस्टरचेही नुकसान

पिके करपली, चाऱ्याचा प्रश्न पेटला!

“डिंभे उजव्या कालव्यावर अवलंबून असणाऱ्या ४५ गावांमधील पाणीटंचाई दिवसेंदिवस बिकट बनत आहे. पाणी नसल्यामुळे शेतातील उभी पिके करपू लागली असून जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. कालव्याला तातडीने पाणी सोडण्याबाबत प्रशासनावर दबाव आणण्यासाठी आमचे शिष्टमंडळ लवकरच माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेणार आहे.”

— निलेश टेमकर (सदस्य, पंचायत समिती)

💡

Frequently Asked Questions

  • Que: आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांची मुख्य मागणी काय आहे?

    Ans: हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याला तातडीने पाण्याचे आवर्तन सोडून ४५ गावांतील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, ही मुख्य मागणी आहे.

  • Que: डिंभे कालव्याला पाणी सोडल्याने काय फायदा होणार आहे?

    Ans: कालव्याला पाणी सोडल्यामुळे परिसरातील विहिरी, पाझर तलाव आणि कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होईल, ज्यामुळे करपणारी पिके वाचतील आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल.

  • Que: या समस्येबाबत शेतकरी कोणाची भेट घेणार आहेत?

    Ans: डिंभे उजव्या कालव्यातून तात्काळ पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ माजी गृहमंत्री व स्थानिक नेते दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन निवेदन देणार आहे.

Web Title: Pune ambegaon shirur farmers demand dimbhe right canal water release as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 05:55 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.