
पुणे : पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील अपघात प्रकरण चिघळले आहे. बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेमध्ये भरधान गाडीने अपघात केला. यामध्ये दोन जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. यामध्ये पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाला अवघ्या काही तासात जामीन दिला आणि खायला पिझ्झा आणून दिल्यामुळे सर्वत्र रोष व्यक्त होत होता. या प्रकरणावरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवल्यानंतर पोलिसांनी तातडीने पाऊले उचलली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील पुणे आयुक्तालयामध्ये दाखल झाले आहेत. यासोबत पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
या प्रकरणात चार आरोपींना अटक
पुण्यातील अपघात प्रकरण विरोधकांनी उचलून धरल्यानंतर राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांनी आरोप केले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, पुण्यातील अपघात प्रकरणामध्ये आमचा काहीही संबंध नाही. माझ्या मुलाने असं कृत्य केलं असतं तरी कारवाईचे आदेश दिले असते. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या प्रकरणातील दोन्ही पब सील केले आहेत. आतापर्यंत या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. अपघात प्रकरणाची चौकशी करून योग्य कायदेशीर निर्णय घ्या असे आदेशही दिल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
विशाल अग्रवाल याला उद्या कोर्टात हजर
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची अधिकची माहिती दिली आहे. पोलीस आयुक्त म्हणाले, “या प्रकरणातील आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ब्लॅक आणि कोझी या क्लबचे मालक आणि मॅनेजर यांना तीन दिवसांची कोठडी सुनावली गेली आहे. आज त्यांना कोर्टात नेण्यात आलं होतं. तर वेदांतचे आरोपी विशाल अग्रवाल याला उद्या कोर्टात हजर करण्यात आला आहे. ब्लड पाठवलं असून त्याचे रिपोर्ट आले नाहीत. कोणतीही निगेटिव्ह रिपोर्ट आलेला नाही. आरोपींनी मद्यप्राशन केलं होतं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते दिसत आहे. त्यांनी अल्कोहोलसाठी ऑनलाईन पेमेंट केले होते. त्याचे बिल आले आहे. आमच्याकडील पुराव्यावरून आरोपींनी अल्कहोल घेतल्याचं स्पष्ट झालं आहे,” अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.