
अहीर यांनी सोमवारी चाकण नगर परिषदेला भेट देऊन शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतला. यावेळी नगर परिषद प्रशासन, पदाधिकारी, नगरसेवक तसेच विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी त्यांनी चर्चा केली. शहरातील पायाभूत सुविधा, वाहतूककोंडी, रस्ते, नगर परिषदेसाठी स्वतंत्र जागा, व्यापारी संकुल, प्रशासकीय इमारत, नाट्यगृह आदी महत्त्वाच्या विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
Cockroach Janata Party News: सर्वोच्च न्यायालयाच्या ‘त्या’ आदेशानंतर CJP ची मोठी माघार;
शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या कामांना प्राधान्य देऊन त्यांची यादी तयार करावी, असे आवाहन सचिन अहीर यांनी केले. ते म्हणाले, “राजकीय हस्तक्षेप न करता सर्वांनी शहराच्या विकासासाठी आवश्यक कामे सुचवावीत. नागरिक विकासकामांचा हिशेब विचारतात. शहरातील प्रलंबित प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. नावीन्यपूर्ण योजनांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठीही शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल.”
चाकण शहर आणि औद्योगिक परिसरातील वाढती वर्दळ तसेच सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता शहरातील प्रमुख चौक आणि संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत अहीर यांनी पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त चौबे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. शहरातील आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
Aadhar Housing Finance : आधार हाउसिंग फायनान्सची मोठी भरारी! इंडिया रेटिंग्सकडून ‘IND AA
नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव यांनी चाकण शहरातील विविध प्रश्नांची माहिती अहीर यांना दिली. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना गेल्या दहा वर्षांपासून विकास आराखडा मंजूर झालेला नसल्याने नियोजनबद्ध विकासाला अडथळे निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. नगर परिषदेला स्वतःची प्रशासकीय जागा उपलब्ध नसणे, व्यापारी संकुलाची आवश्यकता तसेच आंबेठाण रस्ता रुंदीकरणाची तातडीची गरज याकडेही त्यांनी लक्ष वेधले. नगराध्यक्षा मनीषा गोरे यांनी नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीसह नाट्यगृह उभारण्यासाठी शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
कॉर्निंग चौकापासून पुणे-नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांचीही अहीर यांनी माहिती घेतली. शेतकऱ्यांनी त्यांच्या अडचणी आणि विविध मागण्या मांडल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.या वेळी शिवसेनेचे कामगार नेते इरफान सय्यद, जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकर, अतुल देशमुख, नगराध्यक्षा मनीषा गोरे, प्रकाश वाडेकर, नगरसेवक, ट्रॅफिकमुक्त कृती समितीचे सदस्य, वारकरी संप्रदायातील ग्रामस्थ तसेच विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.