पुणे : स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कारप्रकरणाचा तपास ५२ दिवसात पुर्णकरून पुणे पोलिसांनी तब्बल ८९३ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. तांत्रिक गोष्टींवर अत्यंत चांगल्या पद्धतीने हा तपास पुर्ण केल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, हा खटला फास्ट ट्रॅकवर चालविला जाणार असून, तिही प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे प्रयत्न पोलिसांचे आहेत.
स्वारगेट बसस्थानकात २५ फेब्रुवारी रोजी गावी निघालेल्या २६ वर्षीय तरुणीवर (वय ३७, रा. गुनाट, ता. शिरूर) याने पार्क केलेल्या शिवशाही बसमध्ये लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला होता. गावी जाण्यास आलेल्या तरुणीला गाडेने ताई म्हणून संवाद साधत तिचा विश्वास संपादन केला. नंतर तिला वाहक असल्याचे सांगत तिला मुक्कामी गाडीत बसण्यास भाग पाडले. तिच्यावर दोनवेळा लैंगिक अत्याचार केला होता. बलात्काराच्या घटनेनंतर गाडे फरार झाला होता.
Devendra Fadnavis Pune Visit: देवेंद्र फडणवीस पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर; ३०० पोलिसांचा फौजफाटा तैनात
तरुणीने देखील तक्रार देण्यास तीन ते चार तास उशिर केला होता. त्यामुळे आरोपी तोपर्यंत मुळ गावी पोहचला होता. पोलिसांनी याप्रकरणात सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावरील पंचनामा, कपड्यांवर डाग तसेच दत्तात्रयचे शुज, कपडे जप्त केले होते. वैद्यकीय तपासणी, डीएनएची देखील तपासणी केली. एकूण ८९३ पानी दोषारोपत्र तयार करत शिवाजीनगर येथील सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.
गुन्हे शाखेने गुरुवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. ए. मकानदार यांच्या न्यायालयात दाखल केले. गुन्हा घडल्यानंतर ५२ दिवसांत आरोपपत्र दाखल केले असून, त्यात ८२ साक्षीदार तपासून पाच साक्षीदारांचे जबाब न्यायालयात नोंदविले आहेत. एकूण १२ पंचनामे करण्यात आले असून, त्यात गुगल सर्च हिस्टरी, तुलनात्मक ध्वनी तीव्रता पडताळणी, ओळख परेड, सीसीटीव्ही आणि निवेदन या पाच महत्त्वाच्या पंचनाम्यातून आरोपीविरोधात भक्कम पुरावे आरोपपत्रात सादर केले आहेत.
बेलीझमध्ये अमेरिकन माजी सैनिकाने विमानाचे केले अपहरण; धाडसी प्रवाशाच्या कृतीने अनेकांचे प्राण बचावले
नराधम दत्तात्रय गाडे याच्यावर भारतीय न्याय संहितेनुसार कलम ६४ (बलात्कारासाठी शिक्षा), ६४ (२) (एम) (वारंवार बलात्कार), ३५१ (२) (धमकावणे), ११५ (२) (जाणीवपूर्वक दुखापत पोहोचविणे) आणि १२७ (२) (डांबून ठेवणे) यानुसार गुन्हा नोंद आहे.