रेल्वेखाली येत ३६ वर्षीय तरूणाने संपविले जीवन; पिंपरे येथील घटना
मांडकी (ता.पुरंदर) येथील एकाने पुणे-मिरज रेल्वे मार्गावर पिंपरी येथे रेल्वेखाली येत आत्महत्या (Committed Suicide) केली. रेल्वे पोलिसांनी या व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेतला असून, पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.
निरा : मांडकी (ता.पुरंदर) येथील एका तरुणाने पुणे-मिरज रेल्वे मार्गावर पिंपरे येथे रेल्वेखाली येत आत्महत्या (Committed Suicide) केली. रेल्वे पोलिसांनी या व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेतला असून, पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.
याबाबत रेल्वे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुरंदर तालुक्यातील पुणे-मिरज रेल्वेमार्गावर पिंपरे गावच्या हद्दीमध्ये नीरा डावा कालव्याच्या जवळ मांडकी येथे राहणाऱ्या सचिन शंकर जगताप या ३६ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. बुधवारी (दि.२६) सकाळी साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. रेल्वेखाली आल्याने सचिन शंकर जगताप यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेचा अधिक तपास रेल्वे पोलीस करीत आहेत.
Web Title: 36 years old dies after falling under train incident at pimpre nira nrka