Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवाळीत प्रवाशांची अडचण होणार दूर; 1200 जादा एसटी बस धावणार, विदर्भ, खान्देश, मराठवाड्यासाठी 900 लालपरी

सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या भागांत जाणाऱ्या प्रवाशांसाठी स्वारगेट बसस्थानकातून जादा बस सोडण्यात येणार आहेत. शिवाजीनगर बसस्थानकातूनही विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 27, 2026 | 01:01 PM
दिवाळीसाठी 1200 जादा एसटी बस; विदर्भ, खानदेश, मराठवाड्यासाठी धावणार 900 लालपरी

दिवाळीसाठी 1200 जादा एसटी बस; विदर्भ, खानदेश, मराठवाड्यासाठी धावणार 900 लालपरी

Follow Us
Follow Us:
  • दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी १२०० जादा एसटी बस सोडण्यात येणार.
  • यापैकी ९०० लालपरी बस विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्याच्या दिशेने धावणार.
  • दिवाळीच्या सुट्टीत गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाचा निर्णय
पुणे : दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे एसटी विभागाने यंदा १२०० जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे. विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ९००, तर सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या भागांसाठी ३०० जादा बस धावणार आहेत. या विशेष बस ४ ते ७ नोव्हेंबरदरम्यान पिंपरी-चिंचवड, स्वारगेट आणि शिवाजीनगर येथून सोडण्यात येणार आहेत.

दिवाळीच्या काळात पुण्यात नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणानिमित्त राहणारे नागरिक मोठ्या संख्येने गावी जातात. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्राकडे जाणाऱ्या बसला मोठी मागणी असते. दुसरीकडे, रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने ऐनवेळी प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एसटीचा पर्याय महत्त्वाचा ठरणार आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी नियमित बससेवेसह जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्याच्या कालवा समितीच्या बैठकीची प्रतीक्षा; शेतकरी, नागरिकांचे लक्ष

विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी यंदा पिंपरी-चिंचवड आगारातून विशेष बस सोडण्यात येणार आहेत. यापूर्वी खडकी कॅन्टोन्मेंट परिसरातून जादा बस सोडल्या जात होत्या. मात्र, जागेची अडचण लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड आगाराला प्राधान्य देण्यात आले आहे. बसच्या पार्किंगसाठी जवळचे मैदान भाड्याने घेण्यात आले असून, नियोजित वेळेनुसार गाड्या रवाना होतील. हे आगार मेट्रोशी जोडलेले असल्याने प्रवाशांना तेथे पोहोचणेही सोयीचे ठरणार आहे.

दरम्यान, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या भागांत जाणाऱ्या प्रवाशांसाठी स्वारगेट बसस्थानकातून जादा बस सोडण्यात येणार आहेत. शिवाजीनगर बसस्थानकातूनही विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या जादा बसचे ऑनलाइन आरक्षण सुरू करण्यात आले असून, प्रवाशांनी आगाऊ आरक्षण करून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.

पिंपरी-चिंचवडमधून जादा बस सोडण्याचे नियोजन

दिवाळीनिमित्त पुण्यातून यंदाही पिंपरी-चिंचवडमधून जादा बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ४ ते ७ नोव्हेंबरदरम्यान पिंपरी-चिंचवड, स्वारगेट आणि शिवाजीनगर येथून या जादा बस धावणार आहेत. यंदा पुण्यातून १२०० बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशांनी आरक्षण करून सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्यावे.

– अरुण सिया, विभाग नियंत्रक, पुणे एसटी विभाग.

FAQ

1. दिवाळीसाठी किती जादा एसटी बस सोडण्यात येणार आहेत?
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर १२०० जादा एसटी बस सोडण्यात येणार आहेत.

2. ९०० जादा बस कुठल्या भागांसाठी धावणार आहेत?
९०० लालपरी बस विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्याच्या दिशेने धावणार आहेत.

3. जादा एसटी बस सोडण्याचा निर्णय का घेण्यात आला?
दिवाळीच्या सुट्टीत गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याने गर्दीचा सामना करण्यासाठी जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे.

Web Title: 900 st buses to operate for vidarbha khandesh and marathwada in diwali nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 12:58 PM

Topics:  

  • Maharashtra ST Buses

संबंधित बातम्या

पुण्यात मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; पदवीधरांसाठी 100, तर शिक्षक मतदारसंघासाठी 42 टेबल
1

पुण्यात मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; पदवीधरांसाठी 100, तर शिक्षक मतदारसंघासाठी 42 टेबल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.