Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; पदवीधरांसाठी 100, तर शिक्षक मतदारसंघासाठी 42 टेबल

मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत कोणतीही चूक होणार नाही, याची काळजी घ्यावी. अपर जिल्हाधिकारी तथा महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक अरुण आनंदकर यांनी शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना, तर सहआयुक्त संजय पलांडे यांनी पदवीधर मतदारसंघातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 27, 2026 | 11:06 AM
मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; पदवीधरांसाठी १००, तर शिक्षक मतदारसंघासाठी ४२ टेबल

मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; पदवीधरांसाठी १००, तर शिक्षक मतदारसंघासाठी ४२ टेबल

Follow Us
Follow Us:
  • पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज.
  • मंगळवारी (दि. २७) बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये मतमोजणी.
  • पदवीधर मतदारसंघासाठी १०० मतमोजणी टेबल उभारण्यात आली
पुणे : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मंगळवारी (दि. २७) बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे. पदवीधर मतदारसंघासाठी १००, तर शिक्षक मतदारसंघासाठी ४२ मतमोजणी टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणी प्रक्रिया अचूक, पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिले.

मतमोजणीच्या अनुषंगाने नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. विभागीय आयुक्त तेली-उगले म्हणाल्या, मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत कोणतीही चूक होणार नाही, याची काळजी घ्यावी. अपर जिल्हाधिकारी तथा महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक अरुण आनंदकर यांनी शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना, तर सहआयुक्त संजय पलांडे यांनी पदवीधर मतदारसंघातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले.

वाढलेल्या मतदानाचा कौल कुणाला? पदवीधरांत सोलापूर आघाडीवर; शिक्षकांत साताऱ्याचा सर्वाधिक प्रतिसाद

प्रशिक्षणात मतपेट्या उघडणे, ५० मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करणे, मतपत्रिकांचे वैध-अवैध वर्गीकरण, विविध नमुने भरणे आणि प्रत्येक फेरीनंतर निकालाचा नमुना जमा करणे आदी प्रक्रियांचे प्रात्यक्षिक देण्यात आले. मतमोजणीसाठी करण्यात आलेल्या सुविधा आणि नियोजनाची माहितीही अधिकाऱ्यांना देण्यात आली.

अशी असेल मतमोजणीची व्यवस्था…

– पदवीधर मतदारसंघ
एकूण मतमोजणी टेबल : १००
मतमोजणी कक्ष : ५
प्रत्येक कक्षात : १० टेबलच्या दोन रांगा
शिक्षक मतदारसंघ
एकूण मतमोजणी टेबल : ४२
मतमोजणी कक्ष : ३
प्रत्येक कक्षात : ७ टेबलच्या दोन रांगा

पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघाचा फैसला आज

पुणे, पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा फैसला आज (मंगळवारी) होणार असून, मतमोजणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पदवीधर मतदारसंघात भाजप-महायुतीच्या डॉ. स्मिता योगेश जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांच्यातील लढतीची चर्चा आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुनील मोदी यांच्यासह ४७ उमेदवार रिंगणात आहेत. पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर, अपक्ष दत्तात्रय सावंत आणि शिवसेना पुरस्कृत सचिन सानप यांच्यात मुख्य चुरस आहे. या मतदारसंघात एकूण ३० उमेदवार आहेत.

FAQ

1. पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांची मतमोजणी कधी होणार आहे?
मंगळवारी (दि. २७) मतमोजणी होणार आहे.

2. मतमोजणी कुठे होणार आहे?
बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे.

3. पदवीधर मतदारसंघासाठी किती मतमोजणी टेबल आहेत?
पदवीधर मतदारसंघासाठी १०० मतमोजणी टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे.

4. शिक्षक मतदारसंघासाठी किती टेबल असतील?
शिक्षक मतदारसंघासाठी ४२ मतमोजणी टेबल ठेवण्यात आली आहेत.

Web Title: Arrangements in place for vote counting in pune 100 tables for the graduates constituency nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 11:06 AM

Topics:  

  • Divisional Commissioner
  • graduate

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.