Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात आता परवानगी घेऊनच उडवा ड्रोन; नाहीतर पोलिसांकडून होणार मोठी कारवाई

गणेशोत्सवातील गर्दीच्या ठिकाणी ड्रोन उडवल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी ड्रोन ऑपरेटर, व्लॉगर्स आणि फोटोग्राफर्स व इतरांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 16, 2026 | 12:19 PM
पुण्यात परवानगीशिवाय ड्रोन उडवला तर होणार कारवाई; व्लॉगर्स, फोटोग्राफर्सवर पोलिसांचा ‘अँटी ड्रोन’ बडगा

पुण्यात परवानगीशिवाय ड्रोन उडवला तर होणार कारवाई; व्लॉगर्स, फोटोग्राफर्सवर पोलिसांचा ‘अँटी ड्रोन’ बडगा

Follow Us
Follow Us:

पुणे : गणेशोत्सव काळात परवानगीशिवाय ड्रोन उडवणाऱ्यावर आता पुणे पोलिसांकडून थेट ड्रोन जप्ती तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी शहराच्या मध्यवर्ती भागात अनेक ठिकाणी अनधिकृतपणे ड्रोनद्वारे चित्रिकरण करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी ‘अँटी ड्रोन पथक’ स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शहरातील विविध भागांत गणेशमूर्तींच्या आगमन मिरवणुका आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यांना मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत अनेक व्लॉगर्स तसेच फोटोग्राफर्सकडून ड्रोन उडवून व्हिडिओ आणि रिल्स तयार करण्यात येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. विशेषतः मध्यवर्ती पुण्यातील गर्दीच्या भागात अनेक ड्रोन ऑपरेटर कार्यरत असल्याचे आढळून आले.

Repo Rate च्या निर्णयापूर्वी RBI चा मोठा मास्टरस्ट्रोक! बँकांकडून 3.93 लाख कोटी रुपये परत घेतले; तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

गणेशोत्सव काळात गर्दीचे व्यवस्थापन, महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा तसेच ड्रोनमुळे निर्माण होणारा संभाव्य धोका लक्षात घेता पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. परवानगीशिवाय ड्रोन उडवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी अँटी ड्रोन पथक सक्रिय करण्यात येणार आहे. या पथकाकडून संशयास्पद अथवा विनापरवाना ड्रोनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

ड्रोन उडविण्यासाठी आवश्यक परवानगी न घेता चित्रिकरण करणाऱ्या ऑपरेटरवर कायदेशीर कारवाई करण्याबरोबरच संबंधित ड्रोनही जप्त केला जाणार आहे. त्यामुळे केवळ सोशल मीडिया रिल्स, यूट्यूब व्हिडिओ अथवा गणेशोत्सवाचे चित्रिकरण करण्यासाठी नियम धाब्यावर बसविणाऱ्या व्लॉगर्सना आता पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

सुरक्षेचा निर्माण होऊ शकतो प्रश्न

गणेशोत्सवातील गर्दीच्या ठिकाणी ड्रोन उडवल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी ड्रोन ऑपरेटर, व्लॉगर्स आणि फोटोग्राफर्स व इतरांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

NPCI New UPI Rules: पेट्रोल पासून रेल्वे तिकीटांपर्यंत! कोणत्या UPI व्यवहारावर द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क

Web Title: Action will be taken if a drone is flown without permission in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 12:19 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.