सौजन्य - सोशल मिडीया
निवडणुकीत दिसली पक्षांची ताकद
पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये स्थानिक नेतृत्व, शैक्षणिक संस्था, सहकारी क्षेत्र आणि पक्षीय संघटनांचे जाळे प्रभावी आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पारंपरिक राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध गटांसह भाजपनेही निवडणुकीत ताकद लावली. त्यामुळे मतदानाची टक्केवारीच नव्हे, तर उमेदवारांचा वैयक्तिक जनसंपर्क, स्थानिक नेतृत्वाचा प्रभाव आणि पक्षांचे संघटनात्मक नियोजनही निकालासाठी निर्णायक ठरणार आहे. पदवीधर मतदारसंघात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव आणि भाजपच्या डॉ. स्मिता जाधव यांच्यातील थेट लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर, भाजपचे कौस्तुभ गावडे आणि इतर अपक्ष उमेदवारांमुळे लढत बहुरंगी व चुरशीची झाली आहे. यामुळे प्रमुख पक्षांची संघटनात्मक ताकद आणि उमेदवारांचा वैयक्तिक संपर्क यांची खरी कसोटी या निवडणुकीत लागली आहे.
जिल्हानिहाय मतदानातून काय संकेत?
पदवीधर मतदारसंघात सोलापूरमधील सर्वाधिक, तर सांगलीतील सर्वात कमी मतदान राजकीय विश्लेषकांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. शिक्षक मतदारसंघात सातारा आणि सोलापूरमधील उच्च मतदानाच्या तुलनेत पुण्यातील कमी मतदानाची नोंद झाली. या फरकामागे मतदारांमधील निरूत्साह, स्थानिक प्रचार यंत्रणेतील त्रुटी, उमेदवारांचा संपर्क आणि राजकीय पक्षांची संघटनात्मक सक्रियता यांसारखे विविध घटक कारणीभूत असू शकतात. मात्र, केवळ मतदानाच्या टक्केवारीवरून कोणत्या पक्षाला अधिक पाठिंबा मिळाला, असा थेट निष्कर्ष काढता येणार नाही. मतविभाजन, उमेदवारांचे स्थानिक प्रभावक्षेत्र आणि पसंतीक्रमानुसार होणारी मतमोजणी हे घटक निकालासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे २७ ऑक्टोबरला होणाऱ्या मतमोजणीकडे उमेदवारांसह राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. जिल्हानिहाय मतदानाचे हे वेगवेगळे चित्र नेमका कोणाच्या बाजूने कौल देणार, याचे उत्तर मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
Ans: पदवीधर मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली, तर सांगली जिल्ह्यात सर्वात कमी मतदान झाले.
Ans: शिक्षक मतदारसंघात सातारा जिल्हा मतदानाच्या टक्केवारीत आघाडीवर राहिला, तर पुणे जिल्ह्यात तुलनेने सर्वात कमी मतदान झाले.
Ans: दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मतदारसंघांची मतमोजणी २७ ऑक्टोबर रोजी होणार असून, त्यानंतर निकाल स्पष्ट होईल.






