Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजप डाव टाकणार; वडगावशेरीतून सुनील टिंगरेंचा पत्ता कट होणार?

भाजपच्या वाटेल्या येणाऱ्या सहापैकी  पर्वती, कोथरूड आणि शिवाजीनगर या तीन मतदारसंघामध्ये भाजपने उमेदवारांची घोषणा भाजपने केली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 21, 2024 | 03:34 PM
भाजप डाव टाकणार; वडगावशेरीतून सुनील टिंगरेंचा पत्ता कट होणार?
Follow Us
Close
Follow Us:

पुणे:  आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रविवारी (20 ऑक्टोबर) आपल्या पहिल्या  99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर महायुतीतील शिंदे गट आणि आणि अजित पवार यांच्या गटाच्या उमेदवारांच्या याद्याही जाहीर होण्याची शक्यता आहे.  भाजपच्या पहिल्या यादीत पुण्यातील तीन जागांवर  उमेदवार निश्चित झाले.

महायुतीकडून अजूनहू पाच जागांवर उमेदवारी जाहीर झालेली नाही. पण वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाची जागा भाजप  आपल्याकडे घेऊ शकतो, अशीही चर्चा सुरू आहे.  त्यामुळेच आज वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी  उपमुख्यमंत्री  अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर  जाऊन त्यांची भेट घेतली. पुण्यातील आठपैकी सहा विधानसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला तर  इतर दोन मतदारसंघ अजित पवार गटाला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा:काँग्रेस-ठाकरे गटाचा वाद मिटला; शरद पवारांच्या मध्यस्थीच्या भूमिकेला यश

भाजपच्या वाटेल्या येणाऱ्या सहापैकी  पर्वती, कोथरूड आणि शिवाजीनगर या तीन मतदारसंघामध्ये भाजपने उमेदवारांची घोषणा भाजपने केली आहे. तर कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघात अद्याप उमेदवारांची घोषणा कऱण्यात आलेली नाही. त्यातच  वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात आपल्याला घेऊन  अजित पवारांना खडकवासला मतदारसंघ देऊ शकतो अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

वडगावशेरी मतदारसंघात सुनील टिंगरेंना उमेदवारी दिल्यास विरोधी पक्षांकडून त्याचे भांडवल केले जाऊ शकते, त्यातच तीन महिन्यांपूर्वी अपघात प्रकरणावरून सुनील टिंगरे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. या सर्व कारणामुळे भाजप वडगावशेरी मतदारसंघ आपल्याकडे घेऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सुनील टिंगरे यांनी तातडीने अजित पवारांची भेट घेतली आहे.

हेही वाचा:Pune Crime News: बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरण; पीडित मुलीला दिलासा

वडगावशेरीतून आपल्याला पुन्हा संधी मिळावी, यासाठी ते दादांच्या भेटीला गेल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे आज किंवा उद्या जाहीर होणाऱ्या यादीत सुनील टिंगरे यांना उमेदवारी मिळणार की त्यांचा पत्ता कट होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Bjps claim on ncps vadgaonsheri constituency of ajit pawar nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2024 | 03:34 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Sunil Tingre

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.