भाजपचा झंझावात असताना पुण्यात एक "युवा" किंगमेकर ठरला आहे. युवा किंगमेकरच्या चाणक्य रणनितीमुळे महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे हे विजयी झाले आहेत.
बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारार्थ जयंत पाटील यांची सभा आयोजित केली होती. तेव्हा जयंत पाटील यांनी राज्यात गाजलेल्या पोरशे अपघातप्रकरणातील दोन युवक-युवतींना श्रद्धांजली वाहून सर्वांचीच मने जिंकली.
आमदार श्रीमंताच्या मुलाचे चोचले पुरवण्यासाठी एखाद्या नोकरासारखी रात्रपाळी करत बसले. अशा आमदाराला आता घरी बसवा, अशा शब्दात जयंत पाटील यांनी टिंगरेंवर टीका केली.
वडगाव शेरीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी सुनील टिंगरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शरद पवारांना नोटीस पाठवणाऱ्या चिल्लर आमदाराला आता जनताच जागा दाखवेल असे बापू पठारे…
शरद पवार आणि आम्हाला ही नोटीस पाठवली आहे, पोलिसांनी, प्रसारमाध्यमांनी बातम्या दाखवल्या होत्य़ा हे सर्व आम्ही लोकशाहीला धरून केलं आहे. पण तरीही आम्हाला नोटीस पाठवली आहे.
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासूनच प्रचाराला प्रारंभ केला आहे. आता मात्र पठारे मतदारसंघात फिरुन प्रचार करत आहेत.
वडगांव शेरी मतदारसंघात मनसेचा मतदार आहे. ताे निर्णायक भुमिका घेऊ शकताे. मनसेकडून या मतदारसंघात उमेदवार उभा केला गेला नाही. यामुळे मनसेचे कार्यकर्ते काेणाच्या बाजुने काैल देणार हे महत्वाचे ठरणार आहे.
राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पुणे शहरात जाेरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये चलबिचल सुरु झाली आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काॅंग्रेस (एसपी) या…
तीन महिन्यांपूर्वी पुण्यात झालेल्या पोर्शे कार अपघाताच्या घटनेने राज्याचीच नव्हे तर संपूर्ण देशाची झोप उडवली होती. त्यानंतर या प्रकरणात आमदार सुनील टिंगरें यांच्यावरही गंभीर आरोप झाले होते. या प्रकरणात, संबंधित…
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यावर पक्षाने पुण्यातील जबाबदारी टाकली असली तरी मुंडे यांना पक्षांतर्गत अनेक आव्हानांवर मार्ग काढावा लागणार असे आत्ताच दिसू लागले आहे. लोकसभा निवडणुकीतील हिशेब पूर्ण करण्याचा…
पुणे अपघात प्रकरणामध्ये राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सुनील टिंगरे यांच्यावर करण्यात आला होता. यानंतर आता त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे.
कल्याणीनगरमधील अपघात घडल्यावर आपले परिचित विशाल अगरवाल यांचा फोन आल्याने आपण पहाटे 3 वाजता येरवडा पोलीस ठाण्यात गेलो होतो, पण पोलिसांवर कोणताही दबाव टाकला नसल्याचं आमदार सुनील टिंगरे यांनी स्पष्टीकरण…