पुणे: राज्यातील अडचणीत सापडलेल्या साखर कारखान्यांना केंद्र सरकारने एनसीडीसीच्यामाध्यमातून साडे सात हजार काेटी रुपयांची मदत केली आहे. ही मदत करताना काेणता पक्ष, नेता यांच्याकडे बघुन नाही तर शेतकऱ्यांकडे बघूनच मदत केली आहे, असे केंद्र सहकार राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ यांनी पत्रकार परीषदेत नमूद करीत, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर टिका केली. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे राज्यात प्रचारसभांचा धडाका पाहायला मिळत आहे. मुरलीधर मोहोळ यांनी शेतकऱ्यांच्या मदतीवरून जयंत पाटील यांच्यावर टिका केली आहे.
भाजपच्या पाच वर्षाच्या संकल्पपत्राविषयीची माहीती मंत्री माेहाेळ यांनी पत्रकार परीषदेत दिली. ते म्हणाले,‘‘ पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण क्षेत्र, सामाजिक जिवनमान उंचविण्याच्या योजनांचा समावेश आहे. संकल्प पत्र तयार करताना ८७७ गावांमधून ८ हजार ५३७ सूचनांचा विचार केलेला आहे. आम्ही दिलेले वचन पाळतो म्हणून आमचे सरकार पुन्हा आलेल आहे. लाडकी बहिण योजनेतुन वर्षाला १८ हजार, किसान सन्मान योजना १५हजार वर्षाला मिळणार आहे.’’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या कामाची माहीती देताना माेहाेळ म्हणाले, ‘‘गेल्या दहा वर्षांत जाहीरनाम्यातील ३७० कलम, तिहेरी तलाक, राम मंदिर उभारणी या अाश्वासनांची पूर्ती केली. मुबंईत कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग केला आहे. गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारने शेतकरी, महिला , तरुणांना स्वावलंबी केल आहे. विकासाच्या दिशेने वेगाने महाराष्ट्र पुढे जात आहे. आगामी पाच वर्षाचे संकल्प पत्रात पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण क्षेत्र, सामाजिक जीवनमान उंचविण्याच्या योजनांचा समावेश आहे. भाजपने ८७७ गावांमधून ८ हजार ५३७ सूचनांचा विचार करून संकल्पपत्र तयार केला आहे’’ असे माेहाेळ यांनी नमूद केले.
‘मी शेतकऱ्याचा मुलगा’
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कारखान्यास केंद्र सरकारने आर्थिक मदत केल्याचा उल्लेख माेहाेळ यांनी प्रचारादरम्यान केला हाेता. त्यावर पाटील यांनी नवीन सहकारमंत्री असा उल्लेख करीत माेहाेळ यांच्यावर टिका केली हाेती. त्यावर माेहाेळ म्हणाले, ‘‘ मी नवीन सहकार मंत्री अाहे, हे मान्य पण सहकार मला माहीती नाही असे नाही. ते सरकार महर्षि असतील पण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे सहकार काय आहे माहिती आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याला मोदी सरकारच्या काळात एनसीडीसीने १ हजार ४४२ कोटी रूपये दिले आहेत. हे मी बोललो ते जयंत पाटील यांना लागले आहेे. परंतु ही मदत देताना केंद्र सरकारने शेतकऱ्यांकडे बघून दिली आहे.’’ या पत्रकार परीषदेस भाजपचे संदीप खर्डेकर, हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर, अमोल कविटकर उपस्थित होते.