Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: अजितदादांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी निष्पक्ष होईल याबाबत शंका : जयंत पाटील

कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूबाबत शंका निर्माण होत असतील तर शासनाने तातडीने सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.ही केवळ राजकीय बाब नाही, तर न्याय आणि पारदर्शकतेचा प्रश्न आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 18, 2026 | 05:15 PM
Jayant Patil Sangli Press Meet 2026, Ajit Pawar Plane Crash Mystery,

Jayant Patil Sangli Press Meet 2026, Ajit Pawar Plane Crash Mystery,

Follow Us
Close
Follow Us:
  • तपास केवळ करून चालणार नाही, तो ‘निष्पक्ष आणि पारदर्शक’ असावा.
  • जनतेच्या मनातील शंका दूर करणे ही सरकारची जबाबदारी आहे.
  • कागदपत्रे, घटनाक्रम आणि साक्षीदारांची सखोल तपासणी करून वस्तुस्थिती समोर आणावी.
Sangali News : अजितदादांच्या मृत्यूबाबत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलेल्या शंका रास्त असून त्यांनी या प्रकरणाचा अभ्यास केला आहे. या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे, मात्र ती चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक होईल का, याबाबत शंका असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केले.

सांगली येथे माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी संबंधित प्रकरणावर भाष्य केले. ते म्हणाले, “आमदार रोहित पवार यांनी अजितदादांच्या मृत्यूबाबत काही मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यांनी केलेल्या निरीक्षणांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. या प्रकरणात सत्य समोर यावे, ही सर्वांची अपेक्षा आहे.”

Rohit Pawar PC: ‘आमचा काका गेलाय, आम्ही शांत बसणार नाही!’ रोहित पवार भाजपवर कडाडले

पाटील म्हणाले की, कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूबाबत शंका निर्माण होत असतील तर शासनाने तातडीने सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.ही केवळ राजकीय बाब नाही, तर न्याय आणि पारदर्शकतेचा प्रश्न आहे. संबंधित यंत्रणांनी दबावमुक्त वातावरणात तपास करावा,” असे त्यांनी नमूद केले.

चौकशी प्रक्रियेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “चौकशी झालीच पाहिजे; मात्र ती निष्पक्षपणे आणि पारदर्शकतेने होईल का, याबाबत जनतेच्या मनात शंका आहे. या शंका दूर करण्याची जबाबदारी शासनाची आहे.” या प्रकरणी सर्व संबंधित कागदपत्रे, घटनाक्रम आणि साक्षीदारांची माहिती तपासून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी त्यांनी केली. सत्य बाहेर येणे हेच लोकशाहीसाठी हितावह असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटले असून संबंधित प्रकरणाच्या चौकशीबाबत पुढील भूमिका काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Rohit Pawar PC: पायलटचा वापर करून अजित पवारांच्या विमानाचा

रोहित पवार  नेमकं काय म्हणाले?

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत विमान  अपघात तपास ब्युरोचा अहवाल आल्यानंतरही अनेक शंका उपस्थित होत आहे. या अहवालानुसार विमानाच्या ब्लॅक बॉक्सचे  नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यावरून रोहित पवार यांनी पुन्हा एकदा VSR विमान कंपनीच्या कारभार आणि तपासावर प्रश्न उपस्थित केले आहेत.याचवेळी त्यांनी व्हीएसआर  कंपनीला वाचवण्यचा कोण प्रयत्न करतय, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे.

रोहित पवार म्हणाले की,  काही लोक यात मैत्री आणि राजकारण आणण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीत मोठे गुंतवणूकदार आहेत. त्यात मी जाणार नाही. पण कंपनीत शेकडो कोटींची गुंतवणूक असल्यामुळे कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.  १००-१५० कोटींसाठी कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करू नका, अशी माझी गुंतवणूक दारांना विनंती आहे. नाहीतर आम्ही शांत बसणार नाही, आमचा काका गेलाय, असा इशारा रोहित पवारांनी यावेळी दिला.

 

 

 

Web Title: Maharashtra politics doubts whether the investigation into ajitdadas death case will be fair jayant patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • jayant patil
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Sangli Politics: जयंत पाटील यांना मोठा दणका; सांगली बाजार समितीचे त्रिभाजन लागू
1

Sangli Politics: जयंत पाटील यांना मोठा दणका; सांगली बाजार समितीचे त्रिभाजन लागू

Baramati by election : “अजितदादाच ही निवडणूक लढवतायेत असं…; सुनेत्रा काकींसाठी रोहित पवारांची भावनिक साद
2

Baramati by election : “अजितदादाच ही निवडणूक लढवतायेत असं…; सुनेत्रा काकींसाठी रोहित पवारांची भावनिक साद

NCP Merger Breaking: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी बड्या नेत्यांची गुप्त बैठक; पडद्यामागे घडामोडींना वेग
3

NCP Merger Breaking: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी बड्या नेत्यांची गुप्त बैठक; पडद्यामागे घडामोडींना वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.