Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओतूर परिसरात गॅसचा मोठा तुटवडा; हॉटेल व्यावसायिकांवर ‘चूल’ पेटवण्याची वेळ

ओतूर शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 13, 2026 | 06:23 PM
ओतूर परिसरात गॅसचा मोठा तुटवडा; हॉटेल व्यावसायिकांवर 'चूल' पेटवण्याची वेळ

ओतूर परिसरात गॅसचा मोठा तुटवडा; हॉटेल व्यावसायिकांवर 'चूल' पेटवण्याची वेळ

Follow Us
Follow Us:

​ओतूर/मनोहर हिंगणे : ओतूर शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस मिळत नसल्याने सामान्य गृहिणींचे बजेट कोलमडले असून, हॉटेल व्यावसायिकांना पुन्हा पारंपारिक चुलीवर अन्न शिजवण्याची वेळ आली आहे. या परिस्थितीमुळे परिसरात गॅसचा काळाबाजार होण्याची भीती व्यक्त होत आहे.
​

मिळालेल्या माहितीनुसार, ओतूर आणि आसपासच्या ग्रामीण भागात गॅस वितरणाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. अनेक ग्राहकांनी महिनाभरापूर्वी नोंदणी करूनही त्यांना अद्याप सिलिंडर मिळालेले नाही. गॅस वितरणावेळी ग्राहकांच्या मोबाईलवर येणारा OTP (ओटीपी) वेळेवर येत नसल्याने वितरण ठप्प होत आहे. यामुळे अनेक ठिकाणी ग्राहक आणि गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची आणि वादाचे प्रकार घडत आहेत. ​व्यावसायिक सिलिंडरचा साठा उपलब्ध नसल्याने हॉटेल मालक हवालदिल झाले आहेत. नाईलाजास्तव अनेक मोठ्या हॉटेल्समध्ये लाकडाचा वापर करून चुलीवर स्वयंपाक केला जात आहे, ज्यामुळे ग्राहकांना सेवा देण्यास विलंब होत आहे.

​काळाबाजाराची टांगती तलवार

अधिकृत गॅस एजन्सीकडे ‘नो स्टॉक’चा फलक दिसत असताना, दुसरीकडे काही ठिकाणी अव्वाच्या सव्वा दराने सिलिंडर विकले जात असल्याची चर्चा आहे. टंचाईचा फायदा घेऊन काही मध्यस्थ गॅस टाक्यांचा साठा करून तो चढ्या दराने विकून काळाबाजार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

​”आम्ही पंधरा दिवसांपासून गॅसची वाट पाहत आहोत. ऑनलाईन बुकिंग करूनही गॅस मिळत नाही आणि एजन्सीवर गेल्यावर सर्व्हर डाऊन असल्याचे सांगितले जाते. तासनतास रांगेत उभे राहूनही रिकाम्या हाताने परत जावे लागते.” — एक त्रस्त ग्राहक, ओतूर.

गृहिणींचे बजेट आणि नियोजन कोलमडले!

गॅस वेळेवर उपलब्ध होत नसल्याचा सर्वाधिक फटका गृहिणींना बसत आहे. सकाळी मुलांची शाळा व पतिचा डबा आणि घरातील इतर कामे उरकताना गॅस अचानक संपला आणि बॅकअप सिलेंडरही उपलब्ध नसेल तर मोठी ओढाताण होत आहे. आधी गॅस संपायच्या आत नवीन सिलेंडर घरी येत असे पण आता दोन दोन आठवडे वाट पाहावी लागते अशी व्यथा एका गृहिणीने यावेळी बोलताना मांडली. यामुळे अनेक घरात पुन्हा एकदा जुन्या लाकडी चुली पेटू लागल्या आहेत. ज्यांच्याकडे चुलीची सोय आहे त्यांनी नाइलाजास्तव सरपणाचा वापर सुरू केला आहे. मात्र शहराच्या मध्यवर्ती भागात राहणाऱ्यांना धुराचा त्रास सहन करावा लागत आहे.

ज्यांना चूल पेटवणे शक्य नाही अशा कुटुंबांना हॉटेलमधील जेवणावर अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री बसत असून, मासिक बजेट पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. ओतूर ही मोठी बाजारपेठ असल्याने येथे हॉटेल व्यवसायाची संख्याही मोठी आहे मात्र तिथेही व्यावसायिक गॅसच्या उपलब्धतेबाबत अडचणी येत असल्याचे चित्र आहे. ​गॅस टंचाईमुळे निर्माण झालेला हा गोंधळ पाहता, संबंधित कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि पुरवठा विभागाने यात तातडीने लक्ष घालण्याची मागणी होत आहे. गॅस वितरण सुरळीत न झाल्यास ग्राहकांकडून आंदोलनाचा पवित्रा घेण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा : युद्धामुळे इंधन पेटलं; LPG सिलेंडरसाठी पोलीस बंदोबस्त, नागरिकांच्या लांबच लांब रांगा

Web Title: Citizens have expressed anger due to severe gas shortage in the otur area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 06:22 PM

Topics:  

  • LPG Gas
  • LPG gas cylinder
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल
1

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल

भारताच्या ‘गोल्डन गर्ल्स’; श्रीलंकेचा 147 रन्सने सणसणीत पराभव; PM Modi यांनी दिल्या ‘या’ खास शुभेच्छा
2

भारताच्या ‘गोल्डन गर्ल्स’; श्रीलंकेचा 147 रन्सने सणसणीत पराभव; PM Modi यांनी दिल्या ‘या’ खास शुभेच्छा

Maharashtra Today’s Live News in Marathi:  मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये सुचिका तारियालने जिंकले कांस्यपदक
3

Maharashtra Today’s Live News in Marathi: मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये सुचिका तारियालने जिंकले कांस्यपदक

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका
4

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.