Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डागडुजीकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम; पालखी मार्गावरील दिवे घाटात दरड कोसळली, सुदैवाने जिवितहानी टळली

दिवे घाट हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत येत असून घाटातील या रस्त्याच्या डागडुजीकडे कायमच दुर्लक्ष होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 24, 2024 | 08:04 PM
डागडुजीकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम; पालखी मार्गावरील दिवे घाटात दरड कोसळली, सुदैवाने जिवितहानी टळली

डागडुजीकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम; पालखी मार्गावरील दिवे घाटात दरड कोसळली, सुदैवाने जिवितहानी टळली

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: वारीच्या सोहळ्यात पुण्यातील पालखी मार्गाचे विशेष महत्व आहे. दरम्यान दिवे घाट हा पुणे-पंढरपूर पालखी मार्गावर महत्वाचा असा घाट आहे. दरम्यान पंढरपूर पालखी महामार्गवरील कामांबाबत  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून होत असलेला निष्काळजीपणा आज अनेकांच्या जीवावर बेतता बेतता राहिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दिवे घाटाच्या डागडुजीबाबत ओरड येत होती. मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत होते.  त्याचाच परिणाम म्हणून आज सायंकाळी गर्दीच्या वेळी घाटात मोठी दरड कोसळली आहे. डागडुजीकडे दुर्लक्ष केल्याने दरड कोसळली असल्याचे म्हटले जात आहे.

आज सायंकाळी गर्दीच्या वेळी घाटात मोठी दरड कोसळली. सुदैवाने  त्यावेळी घटनास्थळाजवळून कोणतेही वाहन जात नसल्याने मोठी जीवितहानी टळली. दरड कोसळल्यानंतर घाटात आलेल्या मोठमोठल्या दगडांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी घटनास्थळी धाव घेत महामार्ग अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. घटनेनंतर पोलीस बराच वेळ पोहचू न शकल्याने नागरिकांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.

पुणे पंढरपूर पालखी महामार्गावरील दिवेघाटामध्ये आज सायंकाळी सहाच्या दरम्यान अचानक दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत जीवित किंवा वित्तहानी झाली नसली तरी मोठमोठे दगड रस्त्यावर आल्यामुळे वाहनचालक व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या दुर्घटनेनंतर घाटामध्ये  बराच काळ वाहतुक  कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
दिवे घाट हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत येत असून घाटातील या रस्त्याच्या डागडुजीकडे कायमच दुर्लक्ष होते. मागील काही दिवसांपासून घाट माथ्यावर सतत कोसळत असलेला पाऊस व त्यामुळे अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या दरड कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. महामार्ग प्राधिकरणाकडुन कोसलेल्या दरडी पूर्ण बाजूला न केल्याने पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्या बुजल्या आहेत. त्यामुळेही पावसाचे पाणी रस्तावर वाहत असते. आजची दुर्घटना ही देखील अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणा मुळेच घडल्याचा आरोप प्रवाशांनी केला असून, आज येथून प्रवास करणाऱ्या अनेकांचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती. अशा प्रतिक्रिया देखील त्यांनी दिल्या. या घटनेनंतर बराच वेळ पोलिसांची मदत उपलब्ध न झाल्याने नागरिकांनीच वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.

Web Title: Crack collasped in dive ghat loss of life was avoided palkhi route in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2024 | 08:04 PM

Topics:  

  • MLA Sanjay Jagtap
  • Pune

संबंधित बातम्या

Pune Rain News : पुण्यातील रस्त्यांची अवकाळी पावसात झाली नदी; उपमहापौर परशुराम वाडेकर उतरले रस्त्यावर
1

Pune Rain News : पुण्यातील रस्त्यांची अवकाळी पावसात झाली नदी; उपमहापौर परशुराम वाडेकर उतरले रस्त्यावर

Railway News : पुणे-दौंड रेल्वे मार्गावर नियमांचा भंग! आरक्षित डब्यांमध्ये घुसखोरीमुळे प्रवासी त्रस्त, प्रशासनाचे दुर्लक्ष?
2

Railway News : पुणे-दौंड रेल्वे मार्गावर नियमांचा भंग! आरक्षित डब्यांमध्ये घुसखोरीमुळे प्रवासी त्रस्त, प्रशासनाचे दुर्लक्ष?

Pune Heavy Rain: पुणेकरांची दाणादाण! गुडघाभर पाणी आणि बुडालेल्या कार; अवकाळी पावसाने पुण्यात उडवला हाहाकार
3

Pune Heavy Rain: पुणेकरांची दाणादाण! गुडघाभर पाणी आणि बुडालेल्या कार; अवकाळी पावसाने पुण्यात उडवला हाहाकार

Yo Yo Honey Singh Pune Concert : अपघात, व्यसन, वय… Honey Singh पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात! पुणे येथील Concert होणार रद्द?
4

Yo Yo Honey Singh Pune Concert : अपघात, व्यसन, वय… Honey Singh पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात! पुणे येथील Concert होणार रद्द?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.