Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivsena UBT: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, हा बडा नेता ‘घड्याळ’ हाती घेणार

आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात शिवसेना ठाकरे पक्षासह पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे. राजकारणातील बडा नेता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 24, 2025 | 12:46 PM
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, हा बडा नेता 'घड्याळ' हाती घेणार (फोटो सौजन्य-X)

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, हा बडा नेता 'घड्याळ' हाती घेणार (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

MLA Mahadev Babar To Join Ajit Pawar NCP : हडपसरचे माजी शिवसेनेचे आमदार महादेव बाबर यांच्यासह माजी उपमहापौर बंडू गायकवाड, नीलेश मगर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार यांचे माजी नगरसेवक योगेश ससाणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात शिवसेना ठाकरे पक्षासह राष्ट्रवादींना मोठा धक्का बसणार आहे.

मंगळवारी संध्याकाळी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे. शिवसेनेतील पक्षफुटीनंतर माजी आमदार बाबर हे उद्धव ठाकरे यांच्यासमवेत कायम राहिले होकते. ठाकरेंच्या शिवसेनेतून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते.

मात्र, महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पवार मिळाली होती. त्यामुळे बाबर नाराज झाले होते. विधानसभा निवडणुकीत विरोधी उमेदवाराला थेट पाठिंबा देऊन त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली . त्यानंतर मध्यंतरी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

मात्र, बाबर यांनी आता उपमुख्यमंत्री पवार यांच्यासमवेत जाण्याचा निर्णय घेतला असून, ते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करणार असल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात असलेले माजी उपमहापौर बंडू गायकवाड, नीलेश मगर आणि योगेश ससाणे,हे देखील राष्ट्रवादीत प्रवेश करतील. त्यामुळे हडपसर मतदारसंघात ठाकरेंसह पवारांना मोठा धक्का बसणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढत आहे आणि महापालिका निवडणुकीत पक्षाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

पुढील टप्प्यात अधिक प्रवेश

येत्या काळात काही माजी नगरसेवक आणि अधिकारी महाविकास आघाडीत प्रवेश करतील असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विश्वास आहे. त्यात शिवाजीनगर, वडगाव शेरी आणि खडकवासला मतदारसंघातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Web Title: Ex hadapsar mla mahadev babar to join ajit pawar ncp faction blow to uddhav thackeray shiv sena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2025 | 12:46 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Pune

संबंधित बातम्या

Bapu Pathare News: शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की; बापू पठारे- बंडू खांदवेंमध्ये नेमकं काय झालं?
1

Bapu Pathare News: शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की; बापू पठारे- बंडू खांदवेंमध्ये नेमकं काय झालं?

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
2

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
3

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?
4

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.