Maharashtra Politics: "आम्ही हिंदू आहोत, पण.."; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
युती म्हणून पुण्याकडे दुर्लक्ष केलं- ठाकरे
शिवसेना हे माझ्या वडिलांनी आणि आजोबांनी घडवलेलं नाव – उद्धव ठाकरे
पुणे: शिवसेनेची ताकद पुण्यात आहे. पण आम्ही आतापर्यंत युती आणि आघाडीचे बळी ठरलो. त्यावेळी युती म्हणून पुण्याकडे दुर्लक्ष केलं. त्याबद्दल मी पुणेकरांची माफी मागतो. पण पुणेकरांना हवं असेल तर मी पूर्ण ताकदीने शिवसेना इथे कामाला लावेल. पण हे पुणेकरांनी ठरवायचं आहे. असे उद्धव ठाकरे म्हणाले, पुणे येथे पत्रकारांशी वार्तालापाच्या कार्याक्रमामध्ये ते बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले २००५ पासून राज आणि मी वेगळे झालो होतो, पण मराठीसाठी आम्ही एकत्र आलो. आम्ही एकत्र येतोय म्हणून विरोधकांचे धाबे दणाणले आहेत . त्यांनी भाजपवर जोरदार टीका करताना म्हटले की, “देशाचा विकास नव्हे, तर विनाशाकडे प्रवास सुरू आहे. भाजपला राज्य आणि केंद्र सरकार चालवता येत नाही.”
ठाकरे पुढे म्हणाले, “माझा पक्ष, नाव, चिन्ह चोरून नेणाऱ्यांचे कसले मेरीट? शिवसेना हे माझ्या वडिलांनी आणि आजोबांनी घडवलेलं नाव आहे. निवडणूक आयोग कोण ठरवणार? सत्ता आम्हाला लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हवी आहे. आमच्या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी, शिवभोजन थाळी दिली. आता मात्र शेतकरी दुहेरी संकटात आहे. पीक असताना त्यांना हमीभाव देण्यात आला नाही आणि सगळ पीक पूरात वाहून गेले असताना सरकार संपूर्ण कर्जमाफी करू शकत नाहीये. मी केलेली कर्जमाऊी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली. भाजपने २०१७ मध्ये केलेल्या कर्ज माफीचे हप्ते अजून शेतकऱ्यांना मिळत आहेत.
पुण्याबद्दल बोलताना ठाकरे म्हणाले, “मला प्रामाणिकपणे सांगायचंय, पुण्याबद्दल मला कमी माहिती आहे. पुण्यात दादागिरी होती, आता आहे का माहिती नाही. पुणेकरांबद्दल मी पुरेसे लक्ष दिले नाही, त्याबद्दल माफी मागतो. मुंबईत आम्ही २५ वर्ष विकास केला. स्थानिक प्रश्नांवर निवडणुका लढल्या पाहिजेत. भाजप नाइट लाइफच्या नावाखाली मकाऊ मॉडेल आणतोय, पण आम्ही मुंबईत २४ तास पाणी देऊ शकलो नाही. मात्र त्यासाठी दोन तलाव उभारण्याची तयारी होती. माझं सरकार असतं तर आज समुद्राचं पाणीही लोकांना मिळालं असतं.”
भाजपवर हल्ला चढवत ते म्हणाले, “भाजप हुकूमशाहीकडे देशाला नेत आहे. भ्रष्टाचार वाढला आहे, पण मुख्यमंत्री कारवाई करत नाहीत. धार्मिक तेढ वाढवली जातेय. आम्ही हिंदू आहोत, पण भाजपकडून प्रमाणपत्र घ्यायची गरज नाही. असेही ते म्हणाले. मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन चूक केली नाही. मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. पण ज्यांना सगळं दिलं, तेच पाठीत वार करत असतील, तर वेदना होतात. काही न देता स्वतःची चटणी भाकरी खाऊन दसरा मेळाव्यात येणारे माझे शिवसैनिकांचे प्रेम याच औषध आहे.
UddhavSaheb Thackeray #LIVE | शाखाप्रमुख संवाद व पदाधिकारी मेळावा | अण्णाभाऊ साठे सभागृह, पुणे https://t.co/oy6Yles6m7 — Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) October 4, 2025
आघाडी म्हणून निवडणूक लढवणार का? या प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘हा प्रश्न तिन्ही पक्षाने सोडवला पाहिजे. लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढलो. तिन्ही पक्षाने एकत्र लढलं पाहिजे. तिन्ही पक्षांना वाटलं एकत्र लढायचं तर लढू शकतो. पण कुणाला वाटलं स्वतंत्र लढायचं तर तसं लोकशाही आहे प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे स्थानिक नेते पदाधिकार्यांच्या भावनाही समजून घेऊ.
देवेंद्र फडणवीस हतबल
ठाकरे ब्रँड हा पुण्याचा