Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रसिद्ध युट्यूबर संतोष पंडित यांना जामीन मंजूर; पुणे सत्र न्यायालयाचा निकाल

मंत्री चंद्रकांत पाटील आणि महानगरपालिकेच्या एका महिला नगरसेविकेविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा पंडितवर आरोप आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 17, 2026 | 11:30 AM
प्रसिद्ध युट्यूबर संतोष पंडित यांना जामीन मंजूर; पुणे सत्र न्यायालयाचा निकाल

प्रसिद्ध युट्यूबर संतोष पंडित यांना जामीन मंजूर; पुणे सत्र न्यायालयाचा निकाल

Follow Us
Follow Us:

पुणे : महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि पुणे महानगरपालिकेच्या एका महिला नगरसेविकेविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली पुणे सत्र न्यायालयाने युट्युबर संतोष पंडित यांना जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने पंडित यांना 25000 रुपयांच्या वैयक्तिक जामीनपत्रावर जामीन मंजूर केला आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील आणि महानगरपालिकेच्या एका महिला नगरसेविकेविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा पंडितवर आरोप आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती आणि कारवाईही करण्यात आली होती. जामीन मंजूर करताना न्यायालयाने पंडितवर काही अटीही घातल्या आहेत. या प्रकरणाच्या पुढील सुनावणीदरम्यान या अटींचे पालन करणे बंधनकारक असेल.

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणारी चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिसांकडून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सुनील पांडे (वय ५६, रा. भांडारकर रस्ता, डेक्कन जिमखाना) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.  याप्रकरणी संतोष पंडीत याच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोण आहे संतोष पंडित?

संतोष पंडित हे पुणेकर असून, सोशल मीडियावर ते व्हिडिओ पोस्ट करुन भूमिका मांडत असतात. रस्ते आणि महापालिकेच्या कारभारावर टीका करणाऱ्यांमध्ये ते अग्रेसर असतात. ते स्वतःचा उल्लेख ‘नागरिक पत्रकार’ असा करतात. रस्त्यांवरील खड्डे आणि अन्य समस्यांवर ते आपल्या पद्धतीने टीका करतात. काही वेळा ते अतिरेक करत असल्याने त्यातून ते अडचणीतही आले आहेत.

पत्रकारांनाही विचारला होता प्रश्न

टिळक रोडवरील ग्राहक पेठेसमोर संगीता तिवारी यांच्या ‘गुलाबो गँग’च्या वतीने भोंदू अशोक खरात याच्याविरुद्ध आंदोलन करण्यात आले होते. यावेळी वृत्तांकनासाठी काही पत्रकारही उपस्थित होते. तेथून जात असलेल्या संतोष पंडित यांनी ‘तुमच्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे,’ असे सांगितले. त्यानंतर त्यांनी वाहतूक कोंडीचा व्हिडिओ बनवला. तेथे उपस्थित असलेल्या महिला पत्रकार आणि आंदोलनकर्त्या महिलांवर त्यांनी अत्यंत अर्वाच्च भाषेत टीका करण्यास सुरुवात केली.

दिल्ली हादरली ! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?

Web Title: Famous youtuber santosh pandit granted bail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 11:11 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.