Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुकाराम मुंढेंच्या FDA ची पुण्यात धडक कारवाई! तब्बल ५.२ टन खाद्यपदार्थ ताब्यात तर 559 किलो…

FDA Raid: मोशीतील बिकानेर स्वीट्समधून १६० किलो बर्फी, दापोडीतील रुची मिष्ठान भंडारमधून ७० किलो मावा, तर वडगाव बुद्रुक येथील पंचाली स्वीट्समधून चार किलो मोतीचूर लाडू जप्त करण्यात आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 06, 2026 | 08:03 PM
पुण्यात मिठाई, खव्याचा ५५९ किलो साठा नष्ट

पुण्यात मिठाई, खव्याचा ५५९ किलो साठा नष्ट

Follow Us
Follow Us:
  • पुण्यात मिठाई, खव्याचा ५५९ किलो साठा नष्ट
  • ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत एफडीएची कारवाई
  •  पुण्यात मिठाई, खव्याचा मोठा साठा जप्त
Pune/FDA Raid: सणासुदीच्या काळात मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना, अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात धडक (Diwali 2026) कारवाई केली आहे. ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत गुरुवारी (ता. ५) करण्यात आलेल्या तपासणीत विविध आस्थापनांमधून मोठ्या प्रमाणात संशयित निकृष्ट दर्जाचे मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. यामध्ये पिंपरी सांदस येथील एका (Pune) डेअरीतून तब्बल तीन हजार ९९ किलो खवा जप्त करण्यात आला. या कारवाईत पुणे विभागातील खाद्यपदार्थांच्या साठ्याची एकूण किंमत आणि कारवाईचा अंतिम तपशील प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला असला, तरी त्यात इतर जिल्ह्यांचाही समावेश आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या या मोहिमेंतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील मिठाई दुकाने, खाद्यपदार्थ उत्पादक आणि विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली. नारायणगाव येथील भैरवनाथ फूड्समधून ६६६ किलो महिम हलवा आणि बदाम हलवा जप्त करण्यात आला. रावेत येथील माधव मिठासमधून १४२ किलो केसरी पेढा व बालुशाही, तर मुळशीतील सफा अर्शी स्वीट होममधून ९७ किलो सुटी बुंदी जप्त करण्यात आली.

FDA Raids in Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये FDA ची धडक कारवाई ! २५ लाखांचे तेल आणि तूप जप्त, परवाना निलंबित

मोशीतील बिकानेर स्वीट्समधून १६० किलो बर्फी, दापोडीतील रुची मिष्ठान भंडारमधून ७० किलो मावा, तर वडगाव बुद्रुक येथील पंचाली स्वीट्समधून चार किलो मोतीचूर लाडू जप्त करण्यात आले. बिबवेवाडीतील सोमेश्वर गौरीप्रसाद पारदेशी यांच्याकडून २०० किलो शेव व बुंदी, शिवणे येथील कन्हैया स्वीट्समधून ५१ किलो बर्फी व बुंदी आणि रावेत येथील बंधन स्वीट्समधून ९१ किलो कलाकंद व पेढा जप्त करण्यात आला. चिंचवडमधील बंधन स्वीट्समधून ११९ किलो मीठा मावा, तर शिरूर येथील हिंदवी एजन्सीमधून ५२ किलो स्वीट हलवा जप्त करण्यात आला.

या कारवाईतील सर्वाधिक मोठा साठा पिंपरी सांदस येथील नायकवाडे डेअरी अँड मिल्क प्रॉडक्ट्समध्ये आढळला. या ठिकाणाहून तीन हजार ९९ किलो खवा जप्त करण्यात आला. त्याची अंदाजे किंमत नऊ लाख २९ हजार ७०० रुपये आहे. काही आस्थापनांमध्ये अस्वच्छता, अयोग्य साठवणूक, खाद्यरंगाच्या वापरासंबंधी त्रुटी आणि आवश्यक परवान्यांचा अभाव आढळून आला.

तुकाराम मुंढेंना धक्का ! थेट मंत्रिमहोदयांनीच बदलला ‘तो’ निर्णय; कारवाईलाच स्थगिती

त्यामुळे संबंधितांवर निलंबनाची तसेच व्यवसाय बंद करण्याची कारवाई करण्यात आली. नाशवंत आणि संशयित असुरक्षित स्वरूपाचे खाद्यपदार्थ नष्ट करण्यात आले. अन्न व्यावसायिकांनी आवश्यक परवाने व नोंदणी घेऊनच व्यवसाय करावा, उत्पादन व विक्रीच्या ठिकाणी स्वच्छता राखावी आणि खाद्यपदार्थांची योग्य साठवणूक व हाताळणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुण्यात मिठाईचा किती साठा नष्ट करण्यात आला आहे?

    Ans: पुण्यात मिठाईचा , खव्याचा ५५९ किलो साठा नष्ट करण्यात आला आहे.

  • Que: पिंपरीमधून किती किलो खवा जप्त करण्यात आला?

    Ans: पिंपरी सांदस येथील एका डेअरीतून तब्बल तीन हजार ९९ किलो खवा जप्त करण्यात आला आहे.

Web Title: Fda raid at pune pimpri seized 5 2 tone food items before diwali 2026 tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 08:03 PM

Topics:  

  • FDA Raid

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.