Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुइलेन-बॅरे सिंड्रोममुळे आणखी एकाचा मृ्त्यू; आतापर्यंतच्या मृतांची संख्या पाचवर

मृत व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर ऑटोनॉमिक डिसफंक्शन, क्वाड्रिप्लेजिया आणि उच्च रक्तदाबाच्या तक्रारी समोर आल्या.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 02, 2025 | 10:09 AM
गुइलेन-बॅरे सिंड्रोममुळे आणखी एकाचा मृ्त्यू; आतापर्यंतच्या मृतांची संख्या पाचवर
Follow Us
Close
Follow Us:

पुणे:   गुइलेन-बॅरे सिंड्रोममुळे झालेल्या आणखी एका मृत्यूमुळे मृतांची संख्या पाचवर पोहचली आहे. तर महाराष्ट्रानंतर आसाममध्ये गुइलेन-बॅरे सिंड्रोममुळे झालेल्या पहिल्या मृत्यूमुळे भीती वाढली आहे. महाराष्ट्रात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) मुळे कालपर्यंत चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर जीबीएसमुळे पुण्यात काल पाचवा मृत्यू झाला.  जीबीएसमुळे काल पुण्यात एका 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. या मृत्यूनंतर आता राज्य सरकारही अलर्ट मोडवर आले आहे.

महाराष्ट्रातील नांदेड गावातील एका ६० वर्षीय वृद्धाचा शनिवारी पहाटे १२:३० वाजता पुण्यातील ससून रुग्णालयात मृत्यू झाला. १६ जानेवारीपासून ते रुग्णालयात दाखल होते. पुण्यात जीबीएसच्या प्रकरणांमध्ये सतत होणारी वाढ ही चिंतेची बाब आहे. गंभीर स्थितीत असलेल्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. शुक्रवारपर्यंत आयसीयूमध्ये ४५ रुग्ण दाखल होते, ज्यांची संख्या आता ८३ झाली आहे. व्हेंटिलेटरवरील रुग्णांची संख्या १८ वरून २८ झाली आहे. दुसरीकडे, ३८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर अपघात; दोघांचा मृत्यू, पाचजण गंभीर

दुसरीकडे, आसाममध्ये एका किशोरवयीन मुलीचा पहिला मृत्यू झाला आहे. या मुलीला गुवाहाटी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तो १७ वर्षांची होती. महाराष्ट्रात, पुण्यात गिलेन-बॅरे सिंड्रोमची भीती जास्त दिसून येत आहे. सरकारने आरोग्य विभागाला सतर्क केले आहे. आसाममध्ये, गुवाहाटीतील प्रतीक्षा रुग्णालयात एका १७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. आसाममध्ये जीबीएसमुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे. ही मुलगी २१ जानेवारीपासून रुग्णालयात दाखल होती आणि ११ दिवस व्हेंटिलेटरवर होती.

पुण्यातील डॉक्टरांनी  शेअर केले अपडेट

पुण्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर ऑटोनॉमिक डिसफंक्शन, क्वाड्रिप्लेजिया आणि उच्च रक्तदाबाच्या तक्रारी समोर आल्या. ससून रुग्णालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, रुग्ण हा खडकवासला येथील रहिवासी होता. नांदेड गावातील हा एक भाग आहे जिथे अनेक जीबीएस प्रकरणे नोंदवली गेली आहेत. रुग्णालयात येण्यापूर्वी त्याला सात दिवसांपासून अतिसाराचा त्रास होत होता. तो रुग्णालयात पोहोचला तेव्हा त्याची प्रकृती गंभीर होती आणि त्याला क्वाड्रिप्लेजिया (हात आणि पायांचा अर्धांगवायू) झाला होता. मृत व्यक्तीवर ससून रुग्णालयात येण्यापूर्वी लहान रुग्णालयांमध्ये उपचार झाले होते. बीजे मेडिकल कॉलेज आणि ससून रुग्णालयाचे डीन डॉ. एकनाथ पवार म्हणाले की, आम्ही शनिवारी पाच रुग्णांना डिस्चार्ज दिला. ससूनमध्ये एकूण २७ रुग्ण आहेत. पुढील २-३ दिवसांत आणखी १० रुग्णांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

नागपूरची जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्र्यांनी चांगलीच गाजवली

खाजगी पाण्याच्या टँकरची तपासणी

पुणे महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या नवीन गावांना सर्वाधिक फटका बसला आहे. आतापर्यंत येथे जीबीएसचे 82  रुग्ण आढळले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 17 रुग्ण आहेत. हा एक गंभीर पण उपचार करण्यायोग्य आजार आहे. कमीत कमी पाच रुग्णांच्या मल नमुन्यांमध्ये आढळलेला कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणू पाण्याच्या नमुन्यांमध्ये आढळला नाही. शुक्रवारी, जीबीएसचे रुग्ण असलेल्या भागात पाणीपुरवठा करणाऱ्या खाजगी टँकरमधून घेतलेल्या 15 नमुन्यांमध्ये कोलिफॉर्म आणि ई. कोलाय बॅक्टेरियाचे प्रमाण जास्त आढळून आले. 14 नमुन्यांमध्ये, ई. कोलायची संख्या प्रति 100 मिलीलीटर 16  पेक्षा जास्त होती. पिण्याच्या पाण्यात आदर्शपणे ई. कोलाय असू नये. जीबीएस हा एक आजार आहे जो मज्जासंस्थेवर परिणाम करतो. यामुळे स्नायू कमकुवत होणे, अर्धांगवायू आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

 

Web Title: Fifth person dies in pune due to guillain barr syndrome nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2025 | 09:25 AM

Topics:  

  • Guillain Barre syndrome

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.