Photo Credit- Social Media समृद्धी महामार्गावर अपघात
Samruddhi Highway Accident News: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी (१ फेब्रुवारी) रात्री या महामार्गावर सिन्नरजवळ एक भीषण अपघात झाला. इनोव्हा कारचा ताबा सुटल्याने ती साईड अँगलला धडकली. या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त कारमधील प्रवासी रत्नागिरी येथील असून, ते प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला आणि देवदर्शनासाठी गेले होते. समृद्धी महामार्गाने परतत असताना त्यांना हा दुर्दैवी अपघात झाला.
रत्नागिरी येथील सात जण कारने प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते. शनिवारी पहाटे, ते समृद्धी महामार्गाने घरी परतत असताना वावी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मलढोण शिवारात सकाळी सुमारे सहाच्या सुमारास त्यांच्या कारवरील चालकाचा ताबा सुटला, त्यामुळे ती पुढील वाहनावर धडकली.
‘…त्यावेळी शरद पवारांनी माझा राजीनामा घेण्याची घाई केली’; छगन भुजबळ यांनी बोलून दाखवली
या भीषण अपघातात रत्नागिरी माळनाका येथील डीएड महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रताप सावंत देसाई (६९), अथर्व किरण निकम (२४) आणि चालक भाग्यवान झगडे (५०) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तसेच निवृत्त सहाय्यक निबंधक किरण निकम (५८), रमाकांत पांचाळ (६०), रत्नागिरी येथील मंदिराचे विश्वस्त संतोष रेडीज (५०) आणि प्रांजल प्रकाश साळवी (२४) हे जखमी झाले आहेत. किरण निकम यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
घटनास्थळी पोलीस तत्काळ दाखल झाले आणि मदतकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतदेह शवविच्छेदनानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि आपत्कालीन सेवांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. महामार्गावरील वारंवार होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि सुरक्षा उपाय अधिक कडक करण्याची गरज असल्याची मागणी होऊ लागली आहे.
मासिक पाळी, गर्भाशयाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी ‘या’ फुलाच्या चहाचे नियमित