Pune Congress Politics: पुणे शहर काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अंतर्गत गटबाजी,टोकाला गेलेल मतभेद, शहराध्यक्ष पदावरून सुरू असलेल्या कुरघोड्या यांमुळे निर्माण झालेला संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष थांबवण्यसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुढाकार घेतल्याची माहिती समोर आली आहे. सपकाळ यांनी पुण्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची मुंबईन बेठक बोलवली आहे. या बैठकीत पुण्यात सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षावर चर्चा केली जाणार अल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात सध्या शहर अध्यक्ष पदावरून मोठी अंतर्गत गटबाजी समोर आली आहे. या या बैठकीत शहराध्यक्ष पदाच्या बदलासंदर्भात चर्चा होणार आहे. पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसमध्ये शहराध्यक्ष पदासाठी मोठी चढाओढ सुरू आहे. त्यामुळे अंतर्गत वातावरणही चांगलच तापलं आहे.
G-7 Summit: पंतप्रधान मोदी कॅनडात दाखल; जॉर्जियो मेलोनींसह इतर राष्ट्राध्यक्षांशी होणार बैठक
या बैठकीला पुणे काँग्रेस निरीक्षक सजेत पाटील हेदेखील उपस्थित राहणार आहेत. त्यांनी पक्षश्रेष्ठींसमोर सादर केलेल्या अहवालावरही चर्चा होणार आहेत. सतेज पाटील यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे पुणे काँग्रेसमध्ये बदल केले जाऊ शकतात. तसेच, त्यंनी सुचवलेलेल संघटनात्मक बदलही अंतिम केले जातील.
राज्यात गेल्या चार वर्षांपासून प्रलिबंत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. पण पुणे शहरात काँग्रेसला लागलेली गळती थांबवायची असेल तर पक्षातील या संघर्षावर आताच तोडगा काढणे आवश्यक आहेत. त्यामुळे सपकाळ यांनी ही बैछक बोलवली असून या बैठकीनंतर शहराध्यक्ष पदाचा निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
साताऱ्यातील वाजेगाव येथील पूल गेला वाहून; कराड-चिपळूण मार्ग बंद, वाहतूकही वळवली
पुणे काँग्रेसमध्ये सध्या तीन वेगवेगळे गट पडले आहेत. यात सध्याचे अध्यक्ष असलेले अरविंद शिंदे, दुसरा गाट म्ङणजे माजी आमदार मोहन जोशी यांचा आणि तिसरा गट माजी आमदार रमेश बागवे यांचा आहे. या तीनही गटाकडून त्यांच्या त्यांच्या इच्छुक उमेदवारांना शहराध्यक्षपद मिळण्यासाठी ताकद लावताना दिसत आहेत. या सर्व गोष्टींवर बैठकीत चर्चा झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील शहराध्यक्ष पदाची जबाबदारी कुणाला देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. हर्षवर्धन सपकाळ कोणता तोडगा काढणार, हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.