Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tipu Sultan Controversy: ‘हर्षवर्धन सपकाळ यांना तात्काळ अटक करा!” टिपू सुलतानशी तुलनेवरून हेमंत पाटील आक्रमक  

सपकाळ यांनी त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावल्याचा दावा करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या विधानातून हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याची संधी मुख्यमंत्र्यांनी शोधली आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 16, 2026 | 04:40 PM
Tipu Sultan Controversy: ‘हर्षवर्धन सपकाळ यांना तात्काळ अटक करा!” टिपू सुलतानशी तुलनेवरून हेमंत पाटील आक्रमक  
Follow Us
Close
Follow Us:
  • सपकाळ यांनी राज्याची माफी मागावी आणि पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक करावी
  • केवळ मतबँकेच्या तुष्टीकरणासाठी महापुरुषांचा अपमान केला जात असल्याचा दावा
  • महाराजांनी ‘स्वराज्य’ उभे केले, तर टिपूने वारशाने मिळालेले राज्य चालवले; दोघांची तुलना करणे चुकीचे.
Tipu Sultan Controversy:  छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्या सोबत करीत त्यांवे शौर्य आणि हिंदवी स्वराज्याचा अपमान करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना अटक करा, अशी मागणी भारत अगेन्स्ट करप्शन चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी सोमवारी (ता.१६) केली. महापुरुषांचा अपमान करण्याची वृत्ती काँग्रेसच्या ‘डीएनए’ मधेच आहे. केवळ काहींच्या तुष्टीकरणासाठी सपकाळ यांनी केलेले वक्तव्य धक्कादायक आणि समाजात तेढ निर्माण करणारे आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

भाजप- काँग्रेस आंदोलनात दगडफेक का झाली? पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलं स्पष्टीकरण

सपकाळ यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे.पुण्यात काँग्रेस कार्यालयासमोर भाजप आणि काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांमध्ये झालेली तुफान दगडफेकीच्या घटनेतून हे सर्व प्रकर्षाने अधोरेखित होतय, असे पाटील म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजाचे मावळे आणि राज्यातील तमाम जनतेच्या भावना सपकाळ यांच्या वक्तव्यामुळे दुखावल्या गेल्या आहेत. सपकाळ यांनी राज्याची माफी मागावी, असे मागणी पाटील यांनी केली.

सपकाळ यांनी त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावल्याचा दावा करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या विधानातून हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याची संधी मुख्यमंत्र्यांनी शोधली आहे, असे वक्तव्य करीत राज्याच्या प्रमुखावर चुकीचे आणि संभ्रम निर्माण करणारे आरोप करणाऱ्या सपकाळांना अटक होणे आवश्यक असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.

New Delhi Railway Project: रेल्वे कनेक्टिव्हिटीला ‘गति शक्ती’! १८,५०९ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी

शिवाजी महाराजांनी पूर्णपणे नवीन राज्यव्यवस्था उभी केली; टिपू सुलतानांनी अस्तित्वात असलेल्या मैसूर राज्याचा विस्तार व आधुनिकीकरण केले.दोघांचा कालखंड, उद्दिष्टे, राज्यनिर्मितीची प्रक्रिया आणि संघर्षाची पार्श्वभूमी वेगळी होती. अशात दोघांना पूर्णपणे समकक्ष म्हणणे ऐतिहासिक दृष्ट्या अचूक ठरत नाही, असे पाटील म्हणाले.

नेमकं काय म्हणाले होते हर्षवर्धन सपकाळ?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (harhvardhan sapkal)  यांनी शनिवारी (14 फेब्रुवारी) बुलढाण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मालेगाव महापालिकेच्या उपमहापौरांनी त्यांच्या कार्यालयीन कक्षात टिपू सुलतानाची प्रतिमा लावण्यात आल्याबद्दल विचारण्यात आले. त्यावर बोलताना सपकाळ म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर टिपू सुलतान याने  इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला. टिपू सुलतान एक शौर्य गाजवणारा योद्धा होता.  शौर्याचे लक्षण म्हणून टिपु सुलतान याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघायला पाहिजे, असे सपकाळ म्हणाले होते.

 

Web Title: Arrest harshvardhan sapkal immediately hemant patil aggressively compares him to tipu sultan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

काँग्रेसच्या सात हजार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबीर, विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शन करणार.
1

काँग्रेसच्या सात हजार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबीर, विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शन करणार.

Thane News : राष्ट्रगीत अपमानाच्या आरोपांवरून ठाण्यात राजकारण तापले; शिवसेनेकडून भाजपवर पलटवार
2

Thane News : राष्ट्रगीत अपमानाच्या आरोपांवरून ठाण्यात राजकारण तापले; शिवसेनेकडून भाजपवर पलटवार

शहरी कामगारांच्या सन्मान, सुरक्षा आणि न्यायासाठी युवक काँग्रेसचा लढा, “मुंबईचा हक्क” अभियानाची मुंबई युवक काँग्रेसकडून घोषणा
3

शहरी कामगारांच्या सन्मान, सुरक्षा आणि न्यायासाठी युवक काँग्रेसचा लढा, “मुंबईचा हक्क” अभियानाची मुंबई युवक काँग्रेसकडून घोषणा

Kerala CM Networth: 1 कोटींचं सोनं… ₹73 लाख डिपॉजिट, केरळच्या नव्या मुख्यमंत्र्यांकडे नेमकी किती संपत्ती?
4

Kerala CM Networth: 1 कोटींचं सोनं… ₹73 लाख डिपॉजिट, केरळच्या नव्या मुख्यमंत्र्यांकडे नेमकी किती संपत्ती?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.