भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षांतील मोठ्या पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त करत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे सर्व श्रेय निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांचे आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.
अजित पवार हे सत्तेसाठी लाचार आहेत त्यामुळे सत्ता सोडून ते राहू शकत नसल्यानेच ते सत्तेतून बाहेर पडणार नाहीत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
भाजपा महायुतीने तरुणांची फसवणूक केल्याने NSUI ने आक्रमक भूमिका घेतली आहे. नोकरी द्या नाहीतर भत्ता द्या, अन्यथा राजीनामा द्या, हे अभियान NSUI राज्यभर चालवणार आहे.
महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर आघाडी करायची की स्वबळावर लढायचे याचा निर्णय घेतला जाईल. मात्र, या निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा लढवण्यावर काँग्रेस पक्षाचा भर असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसने शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. धाराशीव जिल्ह्यातील नेते अशोक भाऊ जगदाळे यांच्यासह असंख्य नेते व पदाधिकारी यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
सर्व जमीन व्यवहारांची श्वेतपत्रिका काढा आणि येत्या हिवाळी अधिवेशनात त्यावर एक संपूर्ण दिवसभर चर्चा करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
पार्थ पवार यांच्या कंपनीने तब्बल 1804 कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन केवळ 300 कोटी रुपयांत विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यावरुन काँग्रेसने टीका केली आहे.
निवडणूक आयोगाचा कारभारच ‘दस नंबरी’ असून ते सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
राहुल गांधी यांनी पुरावे सादर करूनही निवडणूक आयोग जागा होत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की, झोपी गेलेल्याला जागे करणे सोपे आहे, पण झोपेचे सोंग घेणाऱ्याला जागे करणे अवघड आहे.
काँग्रेसचे विनायक तथा अप्पी पाटील भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला असून, त्यामुळे गडहिंग्लज उपविभागातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाआधीच जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप होणार असून पुणे जिल्हा काँग्रेस पक्षातील अनेक वरिष्ठ पदाधिकारी व तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.
अकोला जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते विजय मालोकार यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मालोकार यांनी तीनवेळा विधानसभेची निवडणूक लढवली आहे.
जालना जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पक्षातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
निवडणूक आयोगाला जागे करण्यासाठी सर्व पक्षांनी १ नोव्हेंबरला भव्य मोर्चाचे आयोजन केले असून, या मोर्चात काँग्रेस पक्ष सहभागी होणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले…