Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मद्यपींसाठी मोठी बातमी! ड्रिंक जास्त झाल्यास हॉटेल चालक…; हॉटेल्स असोसिएशनचा महत्वाचा निर्णय

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी मोठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.तर दुसरीकडे पोलिसांकडून देखील कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उद्या ३१ डिसेंबर रोजी जवळपास ३ हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 30, 2024 | 08:45 PM
मद्यपींसाठी मोठी बातमी! ड्रिंक जास्त झाल्यास हॉटेल चालक...; हॉटेल्स असोसिएशनचा महत्वाचा निर्णय

मद्यपींसाठी मोठी बातमी! ड्रिंक जास्त झाल्यास हॉटेल चालक...; हॉटेल्स असोसिएशनचा महत्वाचा निर्णय

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: उद्या ३१ डिसेंबरच्या रात्री पुणे शहरासह सर्वच ठिकाणी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे.नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल्स,पब चालकाकडून मोठी तयारी करण्यात आली आहे.मात्र अस असलं तरी ३१ डिसेंबरच्या रात्री पार्टी करून ड्रिंक पिऊन अनेकवेळा ड्रिंक अँड ड्राईव्ह च्या घटना या घडत असतात.आणि हीच बाब लक्षात घेता आत्ता पुणे शहरातील हॉटेल्स असोसिएशनच्या वतीने एक नियमावली बनविण्यात आली असून आत्ता उद्या ३१ डिसेंबर रोजी पार्टी केल्यावर ड्रिंक जास्त झाल्यास आत्ता हॉटेल चालकच अश्या व्यक्तींना स्वतः च्या पैश्याने ओला उबेर करून घरी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती हॉटेल्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी दिली.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी मोठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.तर दुसरीकडे पोलिसांकडून देखील कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उद्या ३१ डिसेंबर रोजी जवळपास ३ हजार पोलीस तैनात करण्यात आले आहे. अस असताना आत्ता हॉटेल्स वाल्यांनी देखील खबरदारी घेतली आहे.शासनाकडून उद्या ३१ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत हॉटेल्स सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.यामुळे मोठ्या उत्साहात नागरिकांकडून नवीन वर्षाचं स्वागत केलं जाणार आहे.मात्र अस असल तरी खबरदारी म्हणून हॉटेल्स असोसिएशन ने देखील नियमावली बनविली आहे.

हेही वाचा: थर्टी फर्स्टला मद्य पिऊन वाहन चालवताय? मग सावधान; ‘या’ कायद्यानुसार थेट तुरुंगात रवानगी होणार, पोलिसांचा इशारा

याबाबत हॉटेल्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी म्हणाले की सर्वप्रथम आम्ही शासनाला धन्यवाद देतो की त्यांनी पहाटे ५ वाजेपर्यंत हॉटेल्स सुरू ठेवण्याच निर्णय घेतला आहे.आणि या निर्णयानुसारच आम्ही पाच वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवणार आहोत.तसेच खबरदारी म्हणून आम्ही एखाद्या व्यक्तीने जास्त ड्रिंक केल्यास त्याला सर्व्ह करण्याचं बंद करू तसेच त्यांच्या ग्रुप मधील लोकांना देखील आम्ही सांगणार आहोत की यांना आत्ता तुम्ही थांबवा तसेच आम्ही आमच्या स्टॉपला देखील सूचना दिलेल्या आहेत की त्या दिवशी कोणीही वादविवाद करू नये सर्वांनी शांततेत आपली ड्युटी करावी.तसेच आम्ही आमच्या ग्रुप मधील ओला उबेर कार चालकांना देखील सांगितल आहे की उद्या रात्री एक ते दीड नंतर आपण तयार रहा कारण एखाद्या व्यक्तीने जास्त ड्रिंक केली तर त्याला आम्हीच ओला कारने घरी सोडणार आहोत.मग जरी त्यांनी त्यांची दुचाकी किंवा कार आणली असेल तरी आम्ही त्यांना घरी सोडणार आहोत.कारण हे लोक आमचे ग्राहक असून एक दिवस आम्ही ग्राहकांसाठी असा निर्णय घेतला असल्याचं यावेळी शेट्टी यांनी सांगितल.

ते पुढे म्हणाले की शहरातील हॉटेल्स व्यवसायिकांकडून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे.पुणे शहरात फक्त पुणे नव्हे तर आजूबाजूच्या शहरातील लोक देखील नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दाखल झाले आहे.आणि त्याअनुषंगाने विविध ऑफर वेगवेगळ्या हॉटेल्स मध्ये ठेवण्यात आल्या आहे.काही हॉटेल्स मध्ये तर दुसऱ्या दिवशीपर्यंत थांबण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ग्राहकांची पूर्ण खबरदारी हॉटेल्स कडून घेण्यात आली आहे.अस देखील यावेळी शेट्टी म्हणाले.

Web Title: If person drink too much liquor then hote staff will leave you home pune hotel association decision31 st new year party 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2024 | 08:39 PM

Topics:  

  • 31 December

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.