Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘खाली डोक वर पाय’, ‘पन्नास खोके एकदम ओकेच्या’ घोषणा; अब्दुल सत्तारांवर आली सभागृह सोडण्याची वेळ

मंत्री सत्तार नियोजित कार्यक्रमाला दोन तास उशिरा पोहोचले. तेथे आल्यानंतर केवळ एकच प्रतिनिधीला बोलण्याचे निर्देश दिले. मंत्रीमंडळाच्या मीटिंगला जायचे असल्याचे सत्तार यांनी सांगितले. त्यामुळे उपसभापती संतोष सोमवंशी बोलण्यास उभे राहिले. ‘बारा-एक’च्या परवानगीत आर्थिक व्यवहार होत आहेत. पणन मंडळाकडून पैसे घेतले जातात असे सांगत असताना मंत्री सत्तार चिडले.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 03, 2024 | 09:59 PM
‘खाली डोक वर पाय’, ‘पन्नास खोके एकदम ओकेच्या' घोषणा; अब्दुल सत्तारांवर आली सभागृह सोडण्याची वेळ

‘खाली डोक वर पाय’, ‘पन्नास खोके एकदम ओकेच्या' घोषणा; अब्दुल सत्तारांवर आली सभागृह सोडण्याची वेळ

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निगडीतील राज्यस्तरीय परिषदेमध्ये मोठा गोंधळ झाला. उपस्थितांनी ‘खाली डोक वर पाय’, ‘पन्नास खोके एकदम ओके’च्या घोषणा दिल्याने पणन मंत्री अब्दुल सत्तार यांना काढता पाय घ्यावा लागला. तर संतप्त पदाधिकाऱ्यांनी सत्तार यांचा फोटो असणारे फ्लेक्स फाडत राडा केला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. निगडी येथील ग.  दि.  माडगूळकर सभागृहात गुरुवारी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या वतीने राज्यातील ३३० बाजार समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची परिषदेचे आयोजन केले होते. त्या काऱ्यक्रमात सायंकाळी साडे चारच्या सुमारास हा गोंधळ घडला.

 कामकाजात करावयाचे कालानुरूप बदल, शेतमालाच्या विपणनामध्ये अंगीकारावयाच्या आधुनिक बाबी, शेतकरी व इतर सर्व बाजार घटकांना द्यावयाच्या सोयी-सुविधा, त्यात येणाऱ्या अडचणी व त्यावर करावयाच्या उपाययोजना इत्यादी विषयाचे अनुषंगाने संवाद साधण्यासाठी राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती व सचिव यांची ही परिषद होती. या राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सहकार व पणन, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, पणन संचालक विकास रसाळ, महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे सभापती प्रविणकुमार नहाटा, पुणे कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम आणि राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, सचिव, राज्य बाजार समिती संघाचे सदस्य उपस्थित होते.

मंत्री सत्तार नियोजित कार्यक्रमाला दोन तास उशिरा पोहोचले. तेथे आल्यानंतर केवळ एकच प्रतिनिधीला बोलण्याचे निर्देश दिले. मंत्रीमंडळाच्या मीटिंगला जायचे असल्याचे सत्तार यांनी सांगितले. त्यामुळे उपसभापती संतोष सोमवंशी बोलण्यास उभे राहिले. ‘बारा-एक’च्या परवानगीत आर्थिक व्यवहार होत आहेत. पणन मंडळाकडून पैसे घेतले जातात असे सांगत असताना मंत्री सत्तार चिडले. तुम्ही तुमचे प्रश्न मांडा. वाद निर्माण होईल असे वक्तव्य करु नका असे म्हणत माइकचा ताबा घेतला. उपस्थित सभापतींनी सोमवंशी यांना बोलू देण्याची विनंती करताच मंत्री सत्तार यांनी मला राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीला जायचे असे म्हणून परिषदेतून काढता पाय घेतला. त्यामुळे उपस्थित सभापती संतापले.

विरोधात जोरदार घोषणाबाजी

सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘सत्तार यांचे करायचे काय, खाली डोक वर पाय’, ‘पन्नास खोके, एकदम ओके’च्या घोषणा दिल्या गेल्या. सत्तार यांचे पोस्टर फाडण्यात आले. सत्तार यांच्या निषेधाचा ठराव केला गेला. सत्तार यांच्या निषेधार्थ सोमवारी बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  मंत्री सत्तार यांना काही मिनिटात पाय काढावा लागला. माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनस्थळी दाखल झाले.

Web Title: In pimpri event 50 khoke ekdam ok announcement then abdul sattar leave the program place

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2024 | 09:53 PM

Topics:  

  • Abdul Sattar
  • Pimpri
  • Pune

संबंधित बातम्या

Pune Elections : पुण्यात उमेदवारीचा वाद विकोपाला; शिवसेनेच्या उमेदवाराने चक्क ‘एबी फॉर्म’ फाडून खाल्ला
1

Pune Elections : पुण्यात उमेदवारीचा वाद विकोपाला; शिवसेनेच्या उमेदवाराने चक्क ‘एबी फॉर्म’ फाडून खाल्ला

मोठी बातमी! ‘परवानगी नसताना वाहनांवर…’; अजित पवारांच्या ‘या’ नेत्यावर गुन्हा दाखल
2

मोठी बातमी! ‘परवानगी नसताना वाहनांवर…’; अजित पवारांच्या ‘या’ नेत्यावर गुन्हा दाखल

Illegal Liquor Action: महिलांनी मांडली व्यथा, आ. अब्दुल सत्तार यांनी घेतली दखल! डीग्रसमध्ये दारू अड्डे बंद करण्याचे आदेश
3

Illegal Liquor Action: महिलांनी मांडली व्यथा, आ. अब्दुल सत्तार यांनी घेतली दखल! डीग्रसमध्ये दारू अड्डे बंद करण्याचे आदेश

Crime News: तडीपार गुंडाकडे पोलिसांचे दुर्लक्ष! हिंमत एवढी की महिलेचा केला बलात्कार, पोलीस कॉन्स्टेबलचे निलंबन
4

Crime News: तडीपार गुंडाकडे पोलिसांचे दुर्लक्ष! हिंमत एवढी की महिलेचा केला बलात्कार, पोलीस कॉन्स्टेबलचे निलंबन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.