एकेकाळी राहण्यासाठी उत्तम आणि हवेशीर मानले जाणारे पिंपरी-चिंचवड शहर आता प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. आज 'जागतिक हवामान दिन' साजरा होत असताना, शहराची ओळख 'सर्वाधिक प्रदूषित शहर' अशी होऊ लागली आहे.
शासनाकडून वसतिगृहांच्या देखभालीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जात असतानाही मूलभूत सुविधा योग्य प्रकारे उपलब्ध करून दिल्या जात नसल्याचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे.
एका गृहनिर्माण सोसायटीत लिफ्टच्या दरवाजाच्या सापटीत चिमुकलीचा हात अडकल्याची थरारक घटना घडली आहे. सुदैवाने, काही मिनिटांच्या प्रयत्नांनंतर तिचा हात सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.
घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ येमपल्ले यांनी तातडीने चौकशी समिती नेमली आहे. दोषी आढळणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाइकांनी केली आहे.
निगडी-दापोडी मार्गावरील 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर' ग्रेडसेपरेटरमध्ये मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास एक अवजड कंटेनर अडकल्याने वाहतुकीचा मोठा खेळखंडोबा झाला.
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर उपवासाच्या खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. वाढत्या महागाईमुळे यंदा 'उपवास करणेही महाग' पडत असल्याची प्रतिक्रिया गृहिणींमधून व्यक्त होत आहे.
दुर्गा ब्रिगेड पक्षाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळाली आहे, अशी माहिती पक्षाच्या संस्थापक अध्यक्षा दुर्गा भोर यांनी दिली. यानिमित्त भोसरी येथील पक्षाच्या मुख्य कार्यालयाचे अनावरण करण्यात आले.
हिंजवडी फेज–२ मधील गेरा इमारतीत ‘टेकला सोल्युशन’ आणि ‘स्काय सोल्युशन’ ही दोन कॉल सेंटर अनधिकृतपणे सुरू होती. छाप्यात २० हार्ड डिस्क आणि तीन लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.
Hinjewadi News: हिंजवडी व वाकड परिसरात सुरू असलेल्या मोठ्या बांधकामांमुळे धुळीचे प्रदूषण गंभीर झाले आहे. त्यातच उघड्यावर कचरा जाळण्याचे प्रकार नियमित सुरू आहेत.
भयमुक्त समाज अन् शहर ठेवण्यासाठी दिवस-रात्र तैनात असलेले पोलिसच आज असुरक्षिततेच्या छायेत उभे असून, गेल्या दोन वर्षात शहरात ७५ पोलिसांवर हल्ल्यांची नोंद झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देवाभाऊ नावाचा उल्लेख असलेले पोस्टर लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पिंपरी चिंचवड शहरात पहिला अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्काराबेइडे (Scarabaeidae) कुलातील भुंगे पर्यावरणीय दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. काही गोबरावर उपजीविका करणारे, काही वनस्पतीभक्षक, काही मृतजीवांवर तर काही कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांवर उपजीविका करणारे आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात गुरुवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. चिंचवडगावातील नायट्रो जिममध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सध्या शहरात सुमारे ७०% सांडपाणी प्रक्रिया न होता थेट नद्यांमध्ये सोडले जाते. पवना आणि इंद्रायणी या नद्यांमध्ये रोज लाखो लिटर अप्रामाणिकरित्या सांडपाणी मिसळते
Rain News: आपत्ती परिस्थितीत तातडीने कारवाई करता यावी म्हणून पीसीएमसीची आपत्ती प्रतिसाद यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. आवश्यक साधनसामुग्रीसह बचावपथके तैनात करण्यात आली आहेत.
या हल्ल्यात रामचंद्र जखमी झाले असून, वाकड पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याच्याविरुद्ध विधी संघर्ष बालक म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.