पुणे: नांदेड सिटीलगत रस्त्याच्या बाजूने जायका प्रकल्पाअंतर्गत नदी सुधार योजनेचे खोदकाम काम सुरू असताना मातीच्या ढिगारा अंगावर पडून तीन मजूर अडकल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला असून, दोन कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. पालिकेच्या जायका प्रकल्पाच्या नदी सुधारप्रकल्पाअंतर्गत खोदकाम सुरू होते. तेव्हा मातीचा ढिगारा कामगारांच्या अंगावर पडला आणि त्यात कामगार अडकले. अग्निशमन, पोलिस तसेच पीएमआरडीएच्या पथकांने कामगारांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढले. ऐन गर्दीच्या वेळीच प्रकार घडल्याने परिसरात प्रचंड गर्दी झाली होती.
कनीराम प्रजापती (वय ५५, रा. वडगाव बुद्रुक) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर, चेतनलाल प्रजापती (वय ३२, रा. वडगाव बुद्रुक), खुर्शीद अली (वय २७, रा. इंद्रायणी हाइट्स नांदेड गाव) या कामगारांना मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत नांदेड सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, महापालिकेच्या जायका प्रकल्पाच्या नदी सुधार योजनेअतंर्गत पाईपलाईनचे खोदकाम सुरू होते. हे नांदेड सिटी रस्त्यालगत सुरू होते. सात ते आठ फुटापर्यंत माती काढण्यात येत आली होती. याठिकाणी मोठ्या प्रमाणात कामगार काम करत आहेत. दरम्यान, मातीचा ढिगारा काढून बाजूला टाकण्यात येत होता तेथे खाली मजूर काम करत होते.
हडपसर पोलिसांची विनयभंगप्रकरणी मोठी कारवाई; फक्त 24 तासात…
मातीचा टाकलेला ढिगारा खाली काम करणाऱ्या तीन कामगारांच्या अंगावर कोसळला आणि हे कामगार यात अडकले गेले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. याची माहिती मिळताच येथील पीएमआरडीए, महापालिकेच्या अग्निशमन दल तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या दोन कामगारांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात यश आले. मात्र, एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. उशिरा त्याचा मृतदेह मातीच्या ढिघाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान पोलिसांनी यातील ठेकेदाराला रात्री उशिरा ताब्यात घेतले होते.
हडपसर पोलिसांची विनयभंगप्रकरणी मोठी कारवाई
करदार तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करत अवघ्या २४ तासात आरोपपत्र दाखल केले आहे. पोलिसांच्या या तत्परतेने तरुणीने तसेच नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सुमीत पांडुरंग चाबुकस्वार (वय ३६, रा. मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत २९ वर्षीय पिडीत तरुणीने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, गुन्हे शाखेचे निरीक्षक निलेश जगदाळे, अश्विनी जगताप, सहायक निरीक्षक हसीना शिकलगार, विनोद शिर्के यांनी ही कामगिरी केली आहे.