शिक्रापूरात खोल विहिरीत पडलेल्या श्वानाला जीवदान;
शिक्रापूर : शिक्रापूर (ता.शिरुर) येथील एका चाळीस फूट खोल विहिरीमध्ये दोन दिवसांपासून पडलेल्या श्वानाला जीवदान देण्यात प्राणीमित्रांना यश आले आहे. विहिरीतून जीवदान मिळताच श्वानाजवळील दत्ता मंदिरावर नतमस्तक झाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले आहे.
हेदेखील वाचा : Pune Crime Case : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतली पत्रकार परिषद; स्वारगेट प्रकरणावर घेतली आक्रमक भूमिका
शिक्रापूर (ता.शिरुर) येथील मलठण फाटा परिसरातील त्रिमूर्ती कॉलनी भागात माजी उपसरपंच विशाल खरपुडे यांच्या विहिरीच्या जवळून दिवसभर श्वानाच्या ओरडण्याचा आवाज येत असल्याने नागरिकांनी रात्री उशिरा आजूबाजूला पाहणी केली. त्यावेळी विहिरीमध्ये थोडे पाणी असून, त्यामध्ये एक श्वान पडल्याचे नागरिकांना दिसून आले. त्यांनी याबाबतची माहिती रात्री उशिरा निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्षांना दिली. त्यांनतर दुसऱ्या दिवशी भल्या सकाळच्या सुमारास नेचर गार्ड ऑर्गनायझेशन संस्थेचे अध्यक्ष गणेश टिळेकर, वन्यपशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत भाडळे यांनी सदर ठिकाणी धाव घेत अथक परिश्रम घेत विहिरीत पडलेल्या श्वानाला बाहेर काढत जीवदान दिले.
यावेळी नईम शेख, निहाल शेख, मंगेश झुंजारे, कौसर शेख यांसह आदी उपस्थित होते. दरम्यान, श्वानाला पाणी व बिस्कीट देताच श्वानाने त्यावर ताव मारत शेजारीच असलेल्या दत्त मंदिरावर नतमस्तक झाल्याने उपस्थित सर्वच अवाक झाले आणि काही क्षणात श्वान उपस्थितांकडे पाहत मार्गस्थ झाल्याने उपस्थित सर्वांनी प्राणीमित्रांचे आभार मानले.
11 वासरांना मिळाले जीवदान
कत्तलखान्याकडे नेण्यात येणाऱ्या तब्बल ११ वासरांना हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले. मसुचीवाडी ता. वाळवा येथे बेकायदेशीर तोंड बांधलेली वासरे व वाहतूक करणारी २ वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. तर अमोल व संतोष भास्कर शिंदे (रा. बोरगाव.ता. वाळवा) या दोघां तरुणांना अटक केली आहे. रविवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली.
हेदेखील वाचा : Nalasopara Crime: विकृतीचा कळस! सख्ख्या बापाकडून पोटच्या 3 मुलींवर वारंवार लैंगिक अत्याचार, एका मुलीचा चार वेळा गर्भपात…