स्वारगेट प्रकरणावरुन पुण्यात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची पत्रकार परिषद सुरु (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : पुण्यामधील मध्यवर्ती भागामध्ये असणाऱ्या स्वारगेट बसस्थानकामध्ये मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वारगेटमधील पार्क केलेल्या शिवशाही बसमध्ये नराधमाने फसवून 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार केला. यामुळे पुण्यासह राज्यभरामध्ये रोष व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे महिला सुरक्षेवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या घटनेच्या विरोधात विरोधकांनी जोरदार आंदोलन करत आवाज उठवला आहे. यानंतर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे देखील स्वारगेट बसस्थानकांवर दाखल झाले आहेत. त्याचबरोबर गृहराज्यमंत्री योगेश कदम हे देखील पुण्यामध्ये दाखल होत त्यांनी स्वारगेट बसस्थानकाचा आढावा घेतला आहे.
स्वारगेट बसस्थानकावर महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणाचे संपूर्ण राज्यामध्ये पडसाद उमटत आहे. याच पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पुणे दौरा करत स्वारगेट बसस्थानकाची पाहणी केली. त्याचबरोबर पत्रकार परिषद घेत माहिती देखील दिली आहे. योगेश कदम म्हणाले की, “स्वारगेट अत्याचार प्रकरण हे दुर्दैवी आहे. मात्र घटनेची माहिती लवकर मिळाली असती तर आरोपीला लवकर पकडणे झाले असते. आता आरोपीच संभाव्य लोकेशन न मिळता थेट आरोपीला अटक करण्यात आली असती. लवकर बातमी बाहेर आली असती तर आरोपीला लांब पळून जाता आले नसते. घटना लपवून ठेवण्याच प्रकार झालेला नाही. मात्र गुप्तता पाळण्यात आली आहे. जी या केसमध्ये गरजीची होती. आरोपी हा लवकरच पकडला जाईल,” असा विश्वास देखील योगेश कदम यांनी व्यक्त केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
योगेश कदम पुढे म्हणाले की, “पुणे शहरातील ही घटना बसस्थानकाच्या आवारात घडली. पोलिसांच्या मार्फत त्या दिवशी रात्री 12 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत गस्त घालण्यात येत होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये रात्री दीड वाजता सीपी स्वतः गस्त घातल असल्याचे दिसत आहेत. ते बसस्थानकाच्या आवारात फेरी मारुन गेले असून रात्री तीन वाजता देखील पीआय तिथून गेले आहेत. पोलिसांकडून कोणतं दुर्लक्ष झालं किंवा पोलीस गस्त घालत नव्हते अशातील भाग नाही. आरोपीवर चोरीच्या स्वरुपातील गुन्हे दाखल आहे. जे आरोपी गावाकडून शहरामध्ये येतात त्यांचा रेकॉर्ड नसतो. यावर आपण काम करणार आहोत. विशेषतः सीसीटीव्हीची यंत्रणा अधिक कडक आणि त्याचा विस्तार करण्याची गरज आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेत निधी देखील मंजूर केला आहे. यामध्ये चेहरा ओळखता येईल असे सीसीटीव्ही बसवण्याचा प्रयत्न करत आहोत,” अशी माहिती योगेश कदम यांनी दिली आहे.
गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, “स्वारगेट अत्याचार प्रकरणामध्ये आरोपी लवकरात लवकर पकडला जाईल. पोलिसांची आठ पथकं आरोपीच्या मागावर आहे. कोणत्याही प्रकारचा आरडाओरडा न झाल्यामुळे आजूबाजूच्या लोकांना याबाबत कळून आले नाही. बसच्या आजूबाजूला 10 ते 15 लोकं होते. मात्र आरडाओरड न झाल्यामुळे आरोपीला क्राईम सुरळितपणे करता आलं. एस टी महामंडळाकडून खाजगी सुरक्षा घेण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आढावा बैठक घेत यासंबंधित ते निर्णय घेतील. पोलिसांमार्फत गस्त घालण्यात येत आहे. या प्रकरणावेळी देखील गस्त घालण्यात आली असून यामध्ये पोलिसांकडून दुर्लक्ष झाल्याचे म्हणता येणार नाही. प्रायव्हेट सिक्युरिटी असताना त्यांनी सुरक्षा दिली नाही ही बाब नक्कीच दिसून येत आहे. त्यावर काम करणे आवश्यक आहे,” असे मत योगेश कदम यांनी व्यक्त केले आहे.
स्वारगेट अत्याचार प्रकरणाच्या अपडेट घ्या जाणून
स्वारगेट आवारामध्ये अवैध धंदे आणि अत्याचाराच्या घटना होत असल्याचे समोर येण्याबाबत माध्यमांनी प्रश्न केला आहे. यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, “स्वारगेट आगारामध्ये आता ज्या ठिकाणी घडली आहे त्या ठिकाणी पोलिसांनी 2025 पर्यंत जवळपास 7 हजारांहून अधिक कारवाई पोलिसांनी केली आहे. या एका वर्षामध्ये केलेल्या कारवाई आहेत. यामध्ये लहानपासून मोठ्यापर्यंत सर्व कारवाया आहेत. त्यामुळे पोलिसांचे दुर्लक्ष आहे असं म्हणता येणार नाही. फक्त गाडीतून नाही तर खाली उतरुन प्रत्यक्ष गस्त घातली जात आहे. आरोपीला ट्रॅक केले जात आहे लवकरच अटक होईल,” असा विश्वास गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला आहे.