Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“विमानतळाचा प्रश्न प्रलंबित ठेवून कागदाचे विमान…”; शिवतारेंची आमदार जगतापांवर जोरदार टीकास्त्र

मी कोणत्याही पदावर नसताना जेजुरीला पाणी पुरवठा योजना दिली, सासवडला वीर वरून पाणी पुरवठा योजना दिली. जेजुरीचा १४६ कोटींचा विकास आराखडा दिला, असे महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय शिवतारे म्हणाले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 31, 2024 | 02:35 AM
“विमानतळाचा प्रश्न प्रलंबित ठेवून कागदाचे विमान…”; शिवतारेंची आमदार जगतापांवर जोरदार टीकास्त्र
Follow Us
Close
Follow Us:

सासवड: पुरंदरला दिव्यांग भवन उभारणार,  मुंबई मध्ये पुरंदरच्या नागरिकांसाठी पुरंदर भवन उभारणार, स्वतःचे १२०० कोटी टाकून गुंजवणी धरण पूर्ण करणार, खानवडीला भवन उभारणार, एवढेच काय पण  दोन वर्षात पुरंदरच्या विमानतळावरून विमान उड्डाण करणार अशा घोषणा केल्या. पण प्रत्यक्षात किती कामे पूर्ण केली ? असे प्रश्न उपस्थित करतानाच विमानतळाचा प्रकल्प स्वतः अडविला, भूसंपादनच्या अगोदर जागा निश्चित करता आली नाही. मग कशाचे कागदाचे विमान उड्डाण करणार होते का? अशा शब्दात माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आमदार संजय जगताप यांच्यावर चौफेर हल्ला करीत जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

सासवडला हुंडेकरी चौकात नुकत्याच झालेल्या महायुतीच्या सभेत विजय शिवतारे यांनी संजय जगताप यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी माजी आमदार आमदार अशोक टेकवडे, संभाजी कुंजीर, भाजपचे पुरंदर हवेली समन्वयक बाबाराजे जाधवराव,  भाजपचे तालुका अध्यक्ष नीलेश जगताप, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दिलीप यादव, तालुका प्रमुख हरिभाऊ लोळे,  अतुल म्हस्के, महिला आघाडीच्या ममता शिवतारे, राजेंद्र भिंताडे, आरपीआयचे अध्यक्ष पंकज धिवार, गणेश काका जगताप, डॉ राजेश दळवी, भाजपचे निरीक्षक संजय मिश्किल, दत्ता काळे, मंदार गिरमे, यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

मी कोणत्याही पदावर नसताना जेजुरीला पाणी पुरवठा योजना दिली, सासवडला वीर वरून पाणी पुरवठा योजना दिली. जेजुरीचा १४६ कोटींचा विकास आराखडा दिला. एखाद्या भागात बिबट्यांचे प्रमाण वाढले तर लोक बिबट्या सफारी करा म्हणून सांगतात. आणि हे म्हणतात कुत्रा सफारी करा. काय ही चेष्टा. अशा शब्दात आमदार जगताप यांची खिल्ली उडवली आहे.

आमच्या आमदारांना पुरंदरच्या प्रश्र्नाशी काही देणे घेणे नाही. अधिवेशनात पुरंदर उपसा, वीर धरण, गुंजवणी पाणी योजनेचे प्रश्न उपस्थित करण्याऐवजी राज्यातील समस्या महत्वाच्या वाटतात. सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार यांचा प्रश्न विचारण्यापेक्षा माळशिरस आणि पिसर्वे येथील ऊस जाळून गेला तो प्रश्न का विचारले गेले नाहीत ?   पालखी महामार्गाचा प्रश्न विचारण्यापेक्षा मुंबई गोवा महामार्ग चौपादरिकरणचा प्रश्न महत्वाचा वाटतो. का ? तर त्यांच्याकडून कमिशन घेण्यासाठी. मला एवढे कोटी दे नाही तर मी तुझे प्रकरण बाहेर बोलतो. कोरोना काळात स्वतः च्या पैशा ने वाफेचे मशीन वाटले. आणि तुम्ही एकत्रित गोळा करून धान्य कुठे ठेवले ? तेलाचे डबे कुणाला विकले ? अख्या महाराष्ट्रात पुरंदरचे इज्जत घालवली.एकदा टेंडर मंजूर झाल्यावर त्यात बदल केल्यावर पैसे वाचतात.ते खाण्यासाठी गुंजवणी प्रकल्पात बदल केला. असा स्पष्ट आरोप विजय शिवतारे यांनी संजय जगताप यांच्यावर केला आहे.

Web Title: Mahayuti purandar candidate vijay shivtare criticizes on sanjay jagtap about purandar airport

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2024 | 02:35 AM

Topics:  

  • Purandar Airport
  • vijay shivtare

संबंधित बातम्या

Purandar Airport : मोजणी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवले; ड्रोनच्या माध्यमातून मोजणीचा प्रयत्न हाणून पाडला
1

Purandar Airport : मोजणी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवले; ड्रोनच्या माध्यमातून मोजणीचा प्रयत्न हाणून पाडला

मोठी बातमी! Purandar Airport ला राज्य शासनाची मान्यता; 1 जून 2026 पर्यंत…, काय आहेत निर्देश?
2

मोठी बातमी! Purandar Airport ला राज्य शासनाची मान्यता; 1 जून 2026 पर्यंत…, काय आहेत निर्देश?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.