शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या तरच शासनाबरोबर आम्ही पुढील वाटाघाटीस तयार आहोत. मात्र, आमच्या मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री यांच्या कोणत्याही बैठकांना आम्ही उपस्थित राहणार नाही.
पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांना प्रति एकर १ कोटी रुपये देऊ केले आहेत. यावर शेतकऱ्यांचा काय आक्षेप आहे? पुण्याच्या पुरंदर विमानतळासाठी प्रस्तावित भूसंपादनाच्या भरपाई रकमेशी शेतकरी सहमत नाहीत.
विमानतळ होणार असल्याच्या चर्चेमुळे पुरंदर परिसरातील जमिनींचे भाव झपाट्याने वाढले आहेत. या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेत काहीजण विमानतळाच्या नावाखाली प्लॉट विक्री करत आहेत.
पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे येथील ग्रामसभेत दिवाळी पाडव्याच्या दिवशी गावकऱ्यांनी एकमुखाने ठराव मंजूर करत प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला ठाम विरोध दर्शविला.
गेल्या काही दिवसांमध्ये पुरंदर विमानतळाचा वाद चव्हाट्यावर आलेला आहे. जमीन हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ज्यावेळेस जमीन मोजणी केली जात होती, त्यावेळेस सात गावातील शेतकऱ्यांनी या विमानतळाला कसून विरोध केला.
Purandar News: जमीनीची मोजणी पूर्ण झाल्यावर सर्व गावकऱ्यांचे गट करून त्यांच्याशी मागणी व मोबदला याबाबत चर्चा करून त्याबाबतचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे.
विमानतळासाठी सुमारे तीन हजार एकर जमीन घेण्याचे नियोजन असून, २,७०० एकरपेक्षा अधिक जमीन देण्यास शेतकऱ्यांनी संमती दिली आहे. त्यामुळे विमानतळ प्रकल्पास १०० टक्के शेतकरी संमती देत आहेत.
वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी आणि खानवडी या सात गावांतील १२८५ हेक्टर (३ हजार एकर) क्षेत्र संपादित होणार आहे. सुरुवातीला २८३२ हेक्टर क्षेत्रावर प्रकल्प निश्चित होता
केंद्रीय हवाईवाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ शनिवारी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी निमित्त पुरंदरच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी विमानतळ प्रकल्पबाधित गावच्या शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले.
पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांनी भूसंपादनाच्या मोबदल्याचे पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर संपादनासाठी जमीन देण्याबाबत शेतकरी निर्णय घेणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.
भूसंपादन प्रक्रियेचा नोटीस आणि त्यावरील हरकती हा मुद्दा आता जवळपास पूर्ण झाला असून पुढील काळात आता महसूल विभाग, कृषी विभाग आणि ग्रामपंचायत विभागाच्या सहाय्याने थेट बांधावरील सर्व्हे करण्यात येणार आहे.
विजय शिवतारे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सिटी सर्व्हे रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता पावसाळी अधिवेशन सुरु असून यामध्ये निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुरंदर विमानतळासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनाबाबत सात गावांमधील शेतकऱ्यांनी सुमारे २ हजारांहून अधिक हरकती घेतल्या आहेत. या हरकतींवर सोमवारपासून (दि. ९ जून) सुनावणी घेण्यात येणार आहे.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव या सात गावांमध्ये २८३२ हेक्टर क्षेत्रावर विमानतळासाठी भूसंपादन करण्यात येत आहे.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव या सात गावातील सुमारे २८३२ हेक्टर क्षेत्र विमानतळ प्रकल्प साठी संपादित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी सात दिवसात आपला निर्णय सरकारला कळवावा; नाहीतर सरकार आपल्यासमोर प्रस्ताव ठेवेल, असा अल्टिमेटम महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी पुण्यात पत्रकार परिषदेत दिला.
पुणे शहर व जिल्हयाच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने जागरुक आहेत. पुण्याच्या रिंगरोडसाठी अलिकडेच आम्ही 34 हजार कोटी रुपयांची योजना मंजूर केली, असे बावनकुळे म्हणाले.