शिवसेनेचे पुरंदरचे आमदार आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यावर मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात सोमवारी ३० मार्च रोजी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरु आहे. शिवतारे यांनी प्रस्तावित केलेल्या पुरंदर आयटी पार्कबाबत २४ जुलै २०२४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्वतः मान्यता दिली होती.
नीरा–कऱ्हा नदीजोड प्रकल्पाला राज्याच्या अर्थसंकल्पात मंजुरी मिळाल्यामुळे नीरा खोऱ्यातून पावसाळ्यात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी भविष्यात पुरंदर आणि बारामती तालुक्यातील शेतीसाठी उपलब्ध होणार आहे.
विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून, यामध्ये पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी २०२५ -२६ च्या पुरवणी मागण्याबाबत बोलताना पुरंदर हवेली मतदार संघातील विविध प्रश्नांबाबत शासनाचे लक्ष वेधून घेतले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आमदार विजय शिवतारे यांच्यावर नाव न घेता सडकून टीका केली आहे. सासवड स्मार्ट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तुमची ४० वर्षांची सत्ता, ४० वर्षांचा उमेदवार मोडून काढणार, अशा शब्दात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माजी आमदार संजय जगताप यांच्यावर नाव न घेता चौफेर टीका केली.
पुरंदर तालुक्यातील रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण एवढे वाढले आहे की, रस्त्यामध्ये खड्डे आहेत की खड्यात रस्ते हेच लक्षात येईना. वाहन चालकांना तर अक्षरशः जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत.
संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या निवडणुकीत भाजपने नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्षा आनंदिकाकी जगताप यांना निवडणुकीत उतरविण्याचा अखेर निर्णय घेतला आहे.
सिंचन भवन येथे आमदार शिवतारे यांच्या उपस्थितीत पुरंदर उपसा योजना, कऱ्हा नीरा नदीजोड प्रकल्प व अन्य विषयांवर बैठक पार पडली. यावेळी त्यांनी उपसा योजनेच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.
विजय शिवतारे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सिटी सर्व्हे रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता पावसाळी अधिवेशन सुरु असून यामध्ये निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिवसेना शिंदे गटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. दिलप यादव यांनी आपल्या पुतण्या आणि पत्नीवर पिस्तूल रोखून धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. आमदार विजय शिवतारे यांची भाची यांनी याप्रकरणी…
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, पारगाव, एखतपूर, खानवडी, मुंजवडी अशा सात गावात शासनाने विमानतळ प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असून, प्रकल्पासाठी २८३२ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.
पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक विधान भवन पुणे येथे पार पडली. यावेळी बैठकीला जिल्ह्यातील आमदार खासदार, पुणे – पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यातील सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पुणे जिल्हा नियोजन बैठक पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. यावेळी मोजणी विभागाने केलेले सिटी सर्व्हे रद्द करावे अशी मागणी विजय शिवतारे यांनी केली.
गरिबांना केंद्रबिंदू मानून काम करणारे सरकार आहे. सामान्य, कष्टकरी, मजूर लोकांना त्यांच्या घरापर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे आमदार विजय शिवतारे म्हणाले.