Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्वसामान्यांना फटका ! दुधाच्या दरात चार रुपयांची वाढ; पशुखाद्याचे दर वाढल्याने दुधाला ‘भाव’

दुग्धव्यवसायात केवळ जनावरांना खाद्य देऊन भागत नाही, तर हिरवा चारा, सुका चारा, औषधोपचार, मजुरी आणि देखभाल यांचाही मोठा खर्च करावा लागतो. हिरवा चारा पिकवण्यासाठी एकरी सव्वा लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च येत असल्याचे शेतकरी सांगतात.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 18, 2026 | 11:00 AM
दुधाच्या दरात चार रुपयांची वाढ; पाचशे रुपयांनी महागले पशुखाद्य

दुधाच्या दरात चार रुपयांची वाढ; पाचशे रुपयांनी महागले पशुखाद्य

Follow Us
Follow Us:
  • दुधाच्या दरात चार रुपयांची वाढ झाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा.
  • पशुखाद्याच्या दरात मोठी वाढ; १२७० रुपयांची गोणी आता १८८० रुपयांवर.
  • काही ठिकाणी पशुखाद्याची गोणी ४५० ते ५०० रुपयांनी महागली.
आळेफाटा : दुधाच्या दरात चार रुपयांची वाढ झाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र निर्माण झाले. असे असतानाच पशुखाद्याच्या दरांनी मात्र विक्रमी उच्चांक गाठला आहे. दुधाच्या दरात झालेली वाढ एका बाजूला आणि पशुखाद्याच्या वाढत्या किमती दुसऱ्या बाजूला, अशा दुहेरी कात्रीत दूध उत्पादक शेतकरी सापडला आहे.

काही महिन्यांपूर्वी बाराशे सत्तर रुपयांना मिळणारी पशुखाद्याची गोणी आता एक हजार आठशे ऐंशी रुपयांपर्यंत पोहोचल्याने दुग्धव्यवसायाचे गणितच कोलमडले आहे. त्यामुळे दुधाला भाव वाढला, पण हातात पैसा उरला कुठे? असा सवाल दूध उत्पादकांकडून उपस्थित केला जात आहे. शासनाकडून दूध दरवाढीचा गाजावाजा केला जात असला, तरी प्रत्यक्षात पशुखाद्य, सरकी पेंड, खळ, कडबा आणि हिरव्या चाऱ्याच्या वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नातील मोठा हिस्सा जनावरांच्या संगोपनावरच खर्च होत आहे. मागील महिन्यात पशुखाद्याच्या एका पोत्यामागे ८० ते १२० रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर पुन्हा दरवाढ झाल्याने काही ठिकाणी पशुखाद्याची गोणी ४५० ते ५०० रुपयांनी महागल्याची दूध उत्पादकांची तक्रार आहे.

दुग्धव्यवसायात केवळ जनावरांना खाद्य देऊन भागत नाही, तर हिरवा चारा, सुका चारा, औषधोपचार, मजुरी आणि देखभाल यांचाही मोठा खर्च करावा लागतो. हिरवा चारा पिकवण्यासाठी एकरी सव्वा लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च येत असल्याचे शेतकरी सांगतात. जर्सी गायीच्या दैनंदिन खाद्यावरील खर्चही मोठा असल्याने दूध विक्रीतून मिळणारे उत्पन्न आणि प्रत्यक्ष खर्च यांचा ताळमेळ बसवणे कठीण झाले आहे.

पाणी टंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता

नोव्हेंबर महिन्यातच परिसरात शेतीच्या तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. उन्हाळ्यात पाणी टंचाई अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असल्याने हिरवा चारा उपलब्ध होणार कसा, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. विकतचा चारा घेणे परवडत नाही आणि स्वतःच्या शेतात चारा पिकवणेही महाग झाले आहे. अशा परिस्थितीत पशुधन जगवायचे तरी कसे,असा प्रश्न दूध उत्पादकांना सतावत आहे.

FAQ

१. दुधाच्या दरात किती वाढ झाली?
दुधाच्या दरात प्रतिलिटर चार रुपयांची वाढ झाली आहे.

२. पशुखाद्याच्या दरात किती वाढ झाली?
काही ठिकाणी पशुखाद्याची गोणी ४५० ते ५०० रुपयांनी महागली आहे.

३. पशुखाद्याच्या गोणीची सध्याची किंमत किती आहे?
पूर्वी १,२७० रुपयांना मिळणारी गोणी आता सुमारे १,८८० रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

Web Title: Milk prices increased by four rupees animal feed becomes dearer by five hundred rupees nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • Dairy farming
  • Inflation News
  • Milk Price

संबंधित बातम्या

Milk Price Hike: 12 नोव्हेंबरपासून दूध महागणार, मदर डेअरीने वाढवले भाव; आता खिशाला किती पडणार भगदाड
1

Milk Price Hike: 12 नोव्हेंबरपासून दूध महागणार, मदर डेअरीने वाढवले भाव; आता खिशाला किती पडणार भगदाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.