नवभारत-नवराष्ट्र शासन पुरस्कार २०२५ सोहळ्याचे आयोजन
पुणे : पुण्यातील तारवाडे क्लार्क्स इन, शिरोळे रोड, शिवाजी नगर येथे शनिवार, २६ जुलै २०२५ रोजी , सायंकाळी 5 वाजता नवराष्ट्रातर्फे ‘नवराष्ट्र गव्हर्नन्स अवार्ड्स 2025’ या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सरकारी क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. नवभारत- नवराष्ट्र प्रकाशन समूहाच्यावतीने सरकारी क्षेत्रातील उत्कृष्टांना नवराष्ट्र गव्हर्नन्स पुरस्कार २०२५ (Navarashtra Governance Award 2025) ने सन्मानित करण्यात येणार आहे.
नवराष्ट्रच्या या विशेष सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दत्तात्रय भरणे, कॅबिनेट मंत्री, क्रीडा आणि युवा कल्याण महाराष्ट्र राज्य. त्याचबरोबर अण्णा बनसोडे, उपसभापती, महाराष्ट्र विधानसभा आणि चंद्रकांत पुलकुंडवार, आयएएस, विभागीय आयुक्त, पुणे यांची देखील उपस्थित असणार आहे.
प्रशासकीय सेवेत असणाऱ्या अधिकाऱ्यांची कारकीर्द ही सामाजिक बांधिलकी जपणारी आणि एक प्रेरणा देणारी असते. प्रशासकीय सेवेत सर्वसामान्यांना न्याय देण्याची या अधिकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते. याचपार्श्वभूमीवर प्रशासकीय सेवेत यशस्वीरीत्या कारकीर्द पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांना नवभारत- नवराष्ट्र प्रकाशन समूहाच्यावतीने सन्मानित करण्यात येणार आहे. नवराष्ट्र गव्हर्नन्स पुरस्कार २०२५ या सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सहभाग असणार आहे. यामध्ये जिल्हा परिषद (ZP CO), जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ZP DY CO) , तहसीलदार तसेच पश्चिम महाराष्ट्रातील यशस्वी अधिकाऱ्यांचा सहभाग असणार आहे. नवभारत- नवराष्ट्र प्रकाशन समूहाच्यावतीने राज्यभर प्रशासन चळवळीला प्रेरित करण्यासाठी वेबकास्टसाठी आयकॉनिक इव्हेंट मुलाखती ही घेण्यात येणार आहे.