पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा आज पुणे दौरा आहे. मोंदीच्या हस्ते आज पुणे मेट्रोच्या दोन मार्गिकांच उद्घाटन होणार आहे. पुणेकरांच्या वाहतूक व्यवस्थेसाठी आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) किंवा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे दोघेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळतेय. त्यांच्याऐवजी शिवसेनेकडून उद्योगमंत्री सुभाष देसाई हजेरी लावतील. तर उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री सुभाष देसाई हे या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीच्या मणक्यावर काही दिवसांपूर्वीच मोठी शस्त्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे मागील दोन तीन महिन्यांपासून मुख्यमंत्री अनेक महत्वाचा कार्यक्रमांना, बैठकांना अनुपस्थित राहिले. हिवाळी अधिवेशनातही मुख्यमंत्री अनुपस्थित होते. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. सध्या मुख्यमंत्र्यांना प्रवास करणं शक्य होत नसल्यामुळे ते पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या पुणे मेट्रोच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणार आहेत. अशावेळी शिवसेनेकडून उद्योगमंत्री सुभाष देसाई हे या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.
[read_also content=”तर, तुमचं काही खरं नाही…पुतीनची युक्रेनला धमकी, तर झेलेन्स्कीही अडून, म्हणतो ‘झुकेगा नहीं साला’ https://www.navarashtra.com/world/putin-threatens-ukraine-but-volodymyr-zelensky-refuse-to-surrender-nrps-249913.html”]