Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trade War : 50% टॅरिफमागचं कारण रशियाचं तेल नव्हतंच? PM मोदींचा ‘तो’ एक निर्णय आणि Trumpने भारतावर उगवला सूड

India-US Relations : सिनेटर मार्क वॉर्नर यांनी आरोप केला की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खऱ्या आर्थिक कारणांसाठी नव्हे तर वैयक्तिक द्वेषातून भारतावर ५०% कर लादले. यामुळे एक नवीन राजकीय वाद निर्माण झाला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Feb 22, 2026 | 01:26 PM
mark warner claims trump taxed india over nobel peace prize nomination rift

mark warner claims trump taxed india over nobel peace prize nomination rift

Follow Us
Follow Us:
  • वैयक्तिक नाराजीचा दावा
  • करांचा बोजा
  • राजनैतिक विश्वासार्हतेवर प्रश्न

Mark Warner on PM Modi Nobel Peace Prize : भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्रीत सध्या मिठाचा खडा पडल्याचे चित्र दिसत आहे. अमेरिकेने भारतीय उत्पादनांवर लादलेल्या ५० टक्के अवाढव्य करामुळे (Tariff) दोन्ही देशांतील व्यापार तणावात असतानाच, आता एका अमेरिकन सिनेटरने केलेल्या दाव्याने जागतिक राजकारणात भूकंप घडवून आणला आहे. सिनेटर मार्क वॉर्नर यांच्या मते, भारतावर लादलेला हा कर आर्थिक नसून तो पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यातील वैयक्तिक वादाचा परिणाम आहे.

नोबेल पुरस्कार आणि ट्रम्प यांची ‘नाराजी’

व्हर्जिनियातील एका कार्यक्रमात बोलताना मार्क वॉर्नर यांनी अत्यंत धक्कादायक विधान केले. ते म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्काराची प्रचंड ओढ होती. त्यांना अशी अपेक्षा होती की, जागतिक स्तरावर त्यांचे मित्र मानले जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी नोबेल समितीकडे त्यांच्या नावाचा अधिकृत प्रस्ताव पाठवतील. मात्र, मोदींनी तसे न केल्याने ट्रम्प यांच्या अहंकाराला ठेच लागली. वॉर्नर यांचा आरोप आहे की, याच वैयक्तिक तक्रारीतून ट्रम्प यांनी भारताला आर्थिक संकटात टाकण्यासाठी ५० टक्के कराचा बडगा उगारला.

२५% + २५% कराचे गणित: रशिया की केवळ निमित्त?

अधिकृतपणे, ट्रम्प प्रशासनाने भारतावर दोन टप्प्यात कर लादले आहेत. सुरुवातीला २५ टक्के ‘परस्पर कर’ (Reciprocal Tax) लादण्यात आला. त्यानंतर, युक्रेन युद्धाच्या काळात भारताने रशियाकडून सवलतीच्या दरात तेल खरेदी सुरूच ठेवल्यामुळे, ट्रम्प यांनी रशियाला मदत केल्याचा ठपका ठेवत अतिरिक्त २५ टक्के दंडात्मक कर लावला. यामुळे भारतावर एकूण ५० टक्के कर झाला असून, ब्राझीलसोबत भारत आता सर्वाधिक कर सोसणारा देश बनला आहे. मात्र, वॉर्नर यांच्या मते रशिया हे केवळ एक निमित्त असून मूळ कारण ‘नोबेल’ची खुन्नस हेच आहे.

“Donald Trump has thrown away America’s relationship with India because Indian Prime Minister Modi would not support him for a Nobel Peace Prize. He subordinated national interest for personal vanity.” -Prof Francis Fukuyama, American Political Scientist. pic.twitter.com/HYqDrUGKn2 — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) December 25, 2025

credit – social media and Twitter

‘ऑपरेशन सिंदूर’ आणि विश्वासार्हतेचा प्रश्न

सिनेटर वॉर्नर यांनी ट्रम्प यांच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ दाव्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मे २०२५ मध्ये ट्रम्प यांनी दावा केला होता की त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील मोठा अणुसंघर्ष रोखला. मात्र, वॉर्नर यांच्या मते दोन्ही देशांनी हे प्रकरण आपापसात सामोपचाराने सोडवले होते, यात ट्रम्प यांचे श्रेय नव्हते. वॉर्नर यांनी इशारा दिला आहे की, जर अमेरिकेची धोरणे अशीच वैयक्तिक स्वार्थावर आधारित राहिली, तर ‘क्वाड’ (QUAD) आणि ‘२+२’ सारख्या महत्त्वाच्या सुरक्षा चौकटी कमकुवत होतील.

भारतासमोरील आव्हान

एकीकडे मोदी आणि ट्रम्प यांचे ‘हाऊडी मोदी’ आणि ‘नमस्ते ट्रम्प’ सारखे सोहळे जगाने पाहिले आहेत, पण दुसरीकडे अशा प्रकारचे आरोप समोर येणे हे चिंताजनक आहे. अमेरिकन सिनेट इंटेलिजेंस कमिटीचे अध्यक्ष असलेल्या व्यक्तीने असा दावा करणे, हे दर्शवते की अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणातही ट्रम्प यांच्या भारत धोरणाबद्दल प्रचंड असंतोष आहे. आता भारत सरकार या आरोपांवर अधिकृतपणे काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारतावर अमेरिकेने एकूण किती कर लादला आहे?

    Ans: अमेरिकेने भारतावर दोन टप्प्यात २५-२५ टक्के असा एकूण ५० टक्के दंडात्मक आणि परस्पर कर लादला आहे.

  • Que: मार्क वॉर्नर यांनी कोणता खळबळजनक दावा केला आहे?

    Ans: वॉर्नर यांच्या मते, पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांचे नाव नोबेल शांतता पुरस्कारासाठी न सुचवल्यामुळे नाराज होऊन ट्रम्प यांनी भारतावर हे कर लादले आहेत.

  • Que: 'ऑपरेशन सिंदूर' म्हणजे काय?

    Ans: मे २०२५ मध्ये भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेला तणाव ट्रम्प यांनी मध्यस्थी करून सोडवल्याचा दावा केला होता, ज्याला ट्रम्प यांनी 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव दिले होते.

Web Title: Mark warner claims trump taxed india over nobel peace prize nomination rift

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 01:26 PM

Topics:  

  • Donald Trump
  • international news
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Uranium Price: सोन्यापेक्षा महाग असणारे युरेनियम ऑस्ट्रेलिया कोणत्या देशांना विकतो? नुकताच भारताशी झालाय मोठा करार
1

Uranium Price: सोन्यापेक्षा महाग असणारे युरेनियम ऑस्ट्रेलिया कोणत्या देशांना विकतो? नुकताच भारताशी झालाय मोठा करार

Russia-UkraineWar: ट्रम्पच्या निर्णयामुळे युद्धाला फुटले तोंड! युक्रेनचा रशियन तेल प्रकल्पांवर ड्रोन हल्ला; मॉस्कोचे इंधन संकट गडद
2

Russia-UkraineWar: ट्रम्पच्या निर्णयामुळे युद्धाला फुटले तोंड! युक्रेनचा रशियन तेल प्रकल्पांवर ड्रोन हल्ला; मॉस्कोचे इंधन संकट गडद

PM Modi: ऑस्ट्रेलियन महिला कॅमेरामनच्या ‘अशा’ इशाऱ्याने पंतप्रधान मोदींनाही लावले मागे वळायला; ‘या’ मजेदार प्रसंगाचा VIDEO VIRAL
3

PM Modi: ऑस्ट्रेलियन महिला कॅमेरामनच्या ‘अशा’ इशाऱ्याने पंतप्रधान मोदींनाही लावले मागे वळायला; ‘या’ मजेदार प्रसंगाचा VIDEO VIRAL

Trump Assassination Plot : ट्रम्प यांच्या जीवाला धोका? अमेरिकेच्या इराणवर हल्ल्यामागचं खरं कारण आलं समोर; जाणून घ्या इनसाइड स्टोरी
4

Trump Assassination Plot : ट्रम्प यांच्या जीवाला धोका? अमेरिकेच्या इराणवर हल्ल्यामागचं खरं कारण आलं समोर; जाणून घ्या इनसाइड स्टोरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.