Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI Impact Expo 2026: द्विपक्षीय सहकार्यापासून उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंत… पंतप्रधानांनी समेटमध्ये साधला जागतिक नेत्यांशी संवाद

दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एआय समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योग क्षेत्रातील मान्यवरांशी महत्त्वपूर्ण चर्चा केली. तसेच पंतप्रधान मोदी यांनी स्टार्टअप्सच्या सीईओंशी संवाद देखील साधला.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 21, 2026 | 10:36 AM
AI Impact Expo 2026: द्विपक्षीय सहकार्यापासून उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंत... पंतप्रधानांनी समेटमध्ये साधला जागतिक नेत्यांशी संवाद

AI Impact Expo 2026: द्विपक्षीय सहकार्यापासून उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंत... पंतप्रधानांनी समेटमध्ये साधला जागतिक नेत्यांशी संवाद

Follow Us
Close
Follow Us:
  • भूराजकीय मुद्दे आणि भविष्यातील आव्हानांवर चर्चा
  • जगभरातून आलेल्या नेत्यांशी आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांशी महत्त्वपूर्ण चर्चा
  • डीपटेक स्टार्टअप्सच्या सीईओंशी संवाद साधत विविध क्षेत्रातील नवकल्पनांवर भर
इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेच्या पाचव्या दिवशी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातून आलेल्या नेत्यांशी आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांशी महत्त्वपूर्ण चर्चा केली. हैदराबाद हाऊस येथील बैठकीत पंतप्रधानांनी अँटोनियो गुटेरेस (संयुक्त राष्ट्र), अनुराकुमार दिसानायके (श्रीलंका), नवीनचंद्र रामगुलाम (मॉरिशस), स्लोवाकियाचे राष्ट्रपती पीटर पेलेग्रिनी आणि लीख्टेनस्टाईनचे राजकुमार अलोइस यांच्यासोबत द्विपक्षीय संबंध, भूराजकीय मुद्दे आणि भविष्यातील आव्हानांवर चर्चा केली. यावेळी द्विपक्षीय सहकार्य वाढवणे, उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रात भागीदारी मजबूत करणे आणि जागतिक स्तरावर समन्वय वाढवण्यावर भर देण्यात आला. याशिवाय पंतप्रधानांनी १६ एआय आणि डीपटेक स्टार्टअप्सच्या सीईओंशी संवाद साधत विविध क्षेत्रातील नवकल्पनांवर भर दिला.  (फोटो सौजन्य – X)

AI Impact Expo 2026: १० लाख कोटींच्या गुंतवणूकीपासून यूपीआयच्या कौतुकापर्यंत… ईव्हेंटमध्ये काय घडलं? वाचा सविस्तर

Interacted with CEOs of AI and deeptech StartUps at Seva Teerth. They are doing commendable work across sectors such as healthcare, agriculture, space, social enterprise and more. We discussed how to leverage the potential of AI in furthering the welfare of humanity.… pic.twitter.com/GV5lPEB0ju — Narendra Modi (@narendramodi) February 20, 2026

एक ‘डिजिटल वसाहत’ होण्याचा भारताला धोका

वसाहत होण्याचा धोका भारतापुढे आहे. असे परदेशी प्रणालींवर अवलंबून राहणारा डिजिटल देश होऊ द्यायचे नसेल, तर भारताने स्वतः चे मूलभूत एआय तंत्रज्ञान विकसित केले पाहिजे, एआय हे जीवनाच्या प्रत्येक पैलूला आकार देणारे तंत्रज्ञान आहे. त्यामुळे भारताने ते मूळातून समजून घेऊन विकसित केले पाहिजे, ही आपली अपरिहार्य जबाबदारी ठरते, दीर्घकाळात सर्वांत मोठे मॉडेल किंवा चिप असणे अशा तात्पुरत्या तांत्रिक फायद्यांपेक्षा एआय सार्वभौमत्व हे महत्वाचे तंत्रज्ञान आहे. भारताची खरी ताकद भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेत आहे. २२ अधिकृत भाषा आणि असंख्य बोली इथे आहेत आणि हेच आपले बलस्थान आहे. – विवेक राघवन, संस्थापक, सर्वम एआय

एआय-जैविक बुद्धिमत्तेच्या सांगडीमुळे आरोग्यात क्रांती

जैविक बुद्धिमत्ता आणि एआय यांची सांगड वैद्यकीय क्षेत्रात परिवर्तन घडवू शकते. यातून भविष्यातील आजारांचा अंदाज लावणे, पुनर्जन्म विज्ञान आणि आयुर्मान व्यवस्थापनात अभूतपूर्व प्रगती शक्य आहे. जैविक प्रणाली सेग्मेंटेड डेटा सेंटर्सप्रमाणे कार्य करतात. गिगावॅट्स पॉवरवर चालणाऱ्या एआय सिस्टमपेक्षा त्या कमी उर्जेने माहितीचे विश्लेषण करतात. एआय जीवशास्त्र संगम शक्तिशाली परिवर्तनकारी प्रक्रिया असेल आणि भारत या जागतिक बदलाचे नेतृत्व करण्याच्या योग्य स्थितीत आहे. – किरण मजुमदार-शॉ, एमडी, बायोकॉन

फ्रान्स अध्यक्षांनी भारतासाठी शेअर केली खास पोस्ट

फ्रान्सचे अध्यक्ष इम्पॅन्यूएल मॅक्रॉन यांनी भारत भेटीत एआय इम्पॅक्ट परिषदेलाही हजेरी लावली. एकूणच भारतात आलेला अनुभव समृद्धता आणि स्वाताने भारावलेल्या मॅक्रॉन यांनी सोशल मीडिया साईट ‘एक्स’वर विशेष संदेशात भारतातील त्यांच्या सर्वात संस्मरणीय क्षणाचा व्हिडिओ शेअर केला आणि त्यांच्या भेटीदरम्यान मिळालेल्या उत्स्फूर्त स्वागताबद्दल धन्यवाद भारत, अशा शब्दांत आभार व्यक्त केले.

भारत बनणार टेक लीडर? पंतप्रधान Narendra Modi च्या भाषणाने वाढली उत्सुकता! म्हणाले, तंत्रज्ञान माणसांसाठी, त्यांची जागा…

दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी मॅक्रॉन यांनी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याशी चर्चा केली. मॅक्रॉन म्हणाले, ‘आपल्या डिजिटल आव्हानांचे निराकरण गुगलमध्येच करता येत नाही, तर गुगल आणि सर्व भागधारकांसह एकत्रितपणे करता येते’. दिल्ली एआय समिटमध्ये, सुंदर पिचाई यांच्यासोबत, आम्ही फ्रेंच जी-७अध्यक्षपदाच्या प्राधान्यांवर चर्चा केली. आणि मी संदेश दिला, ‘फ्रान्स निवडा.’ त्यावर सुंदर पिचाई यांनीही एक्सवर पोस्ट करीत सांगितले की, त्यांना फ्रेंच राष्ट्राध्यक्षांसोबतची चर्चा आवडली आणि त्यांनी फ्रान्सच्या तांत्रिक क्षमता भविष्यासाठी अनुकूल कसे ठेवतात यावर चचर्चा केली.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Ai impact expo 2026 pm modi holds high level talks with global leaders focus on future tech partnerships tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 10:36 AM

Topics:  

  • AI technology
  • Artificial intelligence
  • PM Narendra Modi
  • tech updates

संबंधित बातम्या

AI Impact Expo 2026: रोडवर नाही, आता आकाशात प्रवास! भारतात हवाई टॅक्सीची एंट्री, फक्त ८ मिनिटांत ३६ किमी उड्डाण
1

AI Impact Expo 2026: रोडवर नाही, आता आकाशात प्रवास! भारतात हवाई टॅक्सीची एंट्री, फक्त ८ मिनिटांत ३६ किमी उड्डाण

AI कंटेंटवर आता लेबल अनिवार्य! बनावट फोटो-व्हिडीओ ३ तासांत हटवण्याचा नवा नियम लागू, वाचा सविस्तर
2

AI कंटेंटवर आता लेबल अनिवार्य! बनावट फोटो-व्हिडीओ ३ तासांत हटवण्याचा नवा नियम लागू, वाचा सविस्तर

“…तसेच समाजासाठी डिजिटल आरोग्य अनिवार्य”; सायबर धोक्यांबाबत आशिष शेलारांचे भाष्य
3

“…तसेच समाजासाठी डिजिटल आरोग्य अनिवार्य”; सायबर धोक्यांबाबत आशिष शेलारांचे भाष्य

“…अशा परिस्थितीत AI महत्वाचे ठरू शकते”;  कृषी क्षेत्राबाबत Devendra Fadnavis यांचे भाष्य
4

“…अशा परिस्थितीत AI महत्वाचे ठरू शकते”; कृषी क्षेत्राबाबत Devendra Fadnavis यांचे भाष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.