
PCMC Politics: पुणे जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीने ‘शतप्रति:शत’ चा नारा दिला असून, जिल्ह्यातील उत्तर भागात असलेल्या 6 तालुक्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ‘‘निवडणूक प्रमुखपदी’’ आमदार महेश लांडगे यांची नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीसह संभाव्य प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) ला आव्हान देण्यासाठी स्थानिक पातळीवर ‘हुकमी एक्का’ बाहेर काढला आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने ‘‘जिल्हा निवडणूक प्रमुख’’ आणि प्रभारी यांची नियुक्ती घोषीत केली. भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेमध्ये पुणे जिल्ह्याचे विभाजन दोन भागांत आहे. उत्तर पुणे जिल्हा (मावळ) आणि दक्षिण पुणे जिल्हा (बारामती) तसेच, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्र भाजपा संघटनेत जिल्हा म्हणून संबोधले जाते. प्रशासकीय संरचनेमध्ये पुणे जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत. 14 नगरपरिषदा, 2 नगरपंचायती आहेत.
Parth Pawar यांनी घरातच उघडली कंपनी? जमीन व्यवहार प्रकरणी जिजाई बंगला वादाच्या भोवऱ्यात
संघटनात्मक रचनेमध्ये पुणे उत्तर जिल्हा (मावळ) मध्ये लोणावळा, तळेगाव, चाकण, राजगुरूनगर शिरुर, आळंदी, जुन्नर अशा 7 नगरपरिषदा आहेत. मंचर आणि वडगाव या दोन नगरपंचायती आहे. तसेच आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, शिरुर, हवेली या 6 पंचायत समिती आहेत. याचप्रमाणे आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, शिरुर, हवेली या 6 तालुक्यांचा समावेश पुणे उत्तर जिल्हा (मावळ) आहे. तसेच, पंचायत समितीचे एकूण 76 गण आणि जिल्हा परिषदेचे एकूण 41 गट या जागांवर होणाऱ्या निवडणुकीची जबाबदारी आमदार महेश लांडगे यांच्याकडे ‘‘निवडणूक प्रमुख’’ म्हणून सोपवली आहे.
विशेष म्हणजे, 2017 मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सोबतीने आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता खेचून आणली होती. किंबहुना, राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पिपंरी-चिंचवडमध्ये लांडगे यांनी 2014 पासून राष्ट्रवादीशी दोन हात करण्याची भूमिका ठेवली. तसेच, 2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान देत निवडणूक जिंकली होती. महाविकास आघाडी सत्तेच्या काळात विरोधी पक्षात असतानाही तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार लांडगे यांना मोठी ताकद दिली. उत्तर पुणे जिल्ह्याची जबाबदारी असली, तरी भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार म्हणून महेश लांडगे यांचा पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीही निर्णायक ‘‘रोल’’ राहणार आहे.
दक्षिण पुणे जिल्हा (बारामती) याची जबाबदारी आमदार राहुल कुल यांच्यावर सोपवण्यात आली आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रमुख म्हणून गणेश बिडकर, तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रमुखपदी आमदार शंकर जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांद्वारे संभाव्य ‘गृहकलह’ कमी करण्याचा प्रयत्न भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी केल्याचे दिसते.
Pune Land Scam प्रकरणी पार्थ पवारांच्या भागीदारांवर गुन्हा दाखल; अधिकारीही अडचणीत
‘हिंदुत्व’ हा भारतीय जनता पक्षाचा आत्मा असून, हिंदुत्वाचा पुरस्कार करत विकासाभिमुख कारभार करणे हा भाजपाचा प्रमुख अजेंडा राहिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ‘विकासाभिमुख हिंदुत्व’ या भूमिकेचा सातत्याने उल्लेख केला आहे. याच विचारसरणीला धरून आमदार महेश लांडगे यांच्याकडे उत्तर पुणे जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्याचे विभाजन झाल्यास उत्तर पुणे जिल्ह्याला ‘शिवनेरी जिल्हा’ असे नाव द्यावे, अशी जाहीर मागणी आमदार लांडगे यांनी केली होती. या मागणीला ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळाला आणि त्यांच्या भूमिकेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच पुतळा — “स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण” — उभारण्यात आला, ज्यामुळे आमदार लांडगे यांची ओळख राज्यभर पोहोचली. २०१४ पासून आजपर्यंत त्यांच्या कार्याचा ध्यास “१० वर्षे विश्वासाची… शाश्वत विकासाची” या टॅगलाईनमधून दिसून येतो.