"आमच्या वारकऱ्यांसाठी ही आमची..."; पालखी मार्गाबाबत पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे महत्वाचे विधान
पुणे: राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजले आहे. दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या राज्यभर प्रचार सभा होत आहेत. महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील राज्यभर प्रचारसभा घेत आहेत. राज्यात विधानसभा निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात आलेली पाहायला मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडी जोरदारपणे आपल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. आज पुण्यातील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार सभा घेतली. पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानावर मोदींची सभा पार पडली. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. नेहमीप्रमाणे मी त्यांनी आपल्या भाषणाला मराठीतून सुरुवात केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात गेलो आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड मोठा जनसमुदाय आणि पुण्याचे प्रेम मिळत आहे. हे जे समर्थ मिळत आहे ते समर्थन सांगत आहे, की महाराष्ट्रात फिर एक बार महायुती सरकार. पुणे आणि भाजपचे नाते विचार, संस्काराचे आहे. पुण्याने नेहमीच भाजपच्या विचारांचे आणि व्हिजनचे समर्थन केले आहे. त्याबद्दल मी पुणेकरांचा आभारी आहे. महायुतीचे नवीन सरकार पुणे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आणखी वेगाने काम करेल. येणारी 5 वर्षे पुण्याच्या विकासाची असणार आहेत.”
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “पुण्याच्या वाहतूक प्रश्नावर महायुती सरकार वेगाने काम करत आहे. तुमची स्वप्न माझ्यासाठी दिवसरात्र काम करण्यासाठी मिळणारी प्रेरणा आहे. तुमचे जीवन सोपे व्हावे ही माझी आणि महायुतीची प्राथमिकता आहे. पुण्यात मेट्रोसेवेचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत आहे. पुणे आउटर रिंगसाठी साडे दहा हजार कोटी रुपये खर्च केले जात आहे. पुण्याला 21 व्या शतकातील एक चांगली दळणवळण व्यवस्था असणारे शहर म्हणून निर्माण करायचे आहे.”
आज कार्तिकी एकादशी आहे. पंढरपूरमध्ये यात्रा सुरू आहे. त्यामुळे पालखी मार्गाबाबत चर्चा होणे स्वाभाविक आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी मार्ग आणि संत द्यानेश्वर पालखी मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. यासाठी 11 हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे. आमच्या वारकऱ्यांसाठी ही आमची समर्पित सेवा आहे. राज्यात विकास कामांची गती अत्यंत वेगवान आहे.
“महायुतीच्या आधी जे या राज्यात सरकार चालवत होते. त्यांच्याकडे सांगण्यासाठी एकही काम नाही आहे. त्यांची अडीच वर्षे ही आमच्या विकास कामांना ब्रेक लावण्यातच गेली. महायुती सरकार हेच विकासाचे व्हीजन असलेले सरकार आहे हे महाराष्ट्र जाणून आहे. भाजपा -महायुती आहे तरच गती आहे. महाराष्ट्राची प्रगती आहे. आज राज्यातील नागरिक कॉँग्रेसचे राजकरण शेजारील कर्नाटक राज्यात पाहत आहे. खोटे बोलून त्यांनी तिकडे मते मागितली. हवेतील आश्वासने दिली. सरकार येताच ते आश्वासने विसरले. कर्नाटकमध्ये रोज कुठला ना कुठला घोटाळा समोर येत आहे. तेथील कॉँग्रेस सरकार जनतेला लुटत आहे. लुटीचा हा पैसे महाराष्ट्रात पाठवून निवडणूक लढवली जात आहे. जर का महाराष्ट्राला वाचवायचे असेल तर कॉँग्रेसला दूरच ठेवयाचे आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातील सभेत म्हणाले.