Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हे फक्त पुण्यातच घडू शकते! बाल्कनीत अडकलेल्या मुलाचा भन्नाट जुगाड; मदतीसाठी थेट ‘Blinkit’वर दिली ऑर्डर अन्…, घटनेचा Video Viral

Pune News: रात्रीचे साधारण ३ वाजले होते, मिहिर आणि त्याचा मित्र गप्पा मारण्यासाठी बाल्कनीत गेले होते. मात्र, अचानक बाल्कनीचा दरवाजा बाहेरून लॉक झाला आणि दोघेही तिथेच अडकले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 09, 2026 | 08:59 PM
हे फक्त पुण्यातच घडू शकते! बाल्कनीत अडकलेल्या मुलाचा भन्नाट जुगाड (photo Credit- X)

हे फक्त पुण्यातच घडू शकते! बाल्कनीत अडकलेल्या मुलाचा भन्नाट जुगाड (photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • रात्री ३ वाजता बाल्कनीत अडकले पुणेकर
  • मदतीला पोलीस नाही तर ‘ब्लिंकिट’चा डिलिव्हरी बॉय आला!
  • पाहा व्हायरल व्हिडिओ
Pune Viral News: संकट काळात सामान्यतः लोक पोलीस, अग्निशमन दल किंवा शेजाऱ्यांना मदतीसाठी साद घालतात. मात्र, पुण्यात एका तरुणाने आपल्या बुद्धीचा वापर करून चक्क एका डिलिव्हरी ॲपच्या माध्यमातून स्वतःची सुटका करून घेतली आहे. या प्रकरण सोशल मीडियावर चांगले चर्चेत आले असुन, ब्लिंकिटच्या (Blinkit) एका डिलिव्हरी एजंटने चक्क ‘सुपरहीरो’ची भूमिका बजावली आहे.

रात्री ३ वाजताचा तो ‘बाल्कनी’ ड्रामा

हा संपूर्ण प्रकार पुण्याच्या मिहिर गहुकर आणि त्याच्या मित्रासोबत घडला. रात्रीचे साधारण ३ वाजले होते, मिहिर आणि त्याचा मित्र गप्पा मारण्यासाठी बाल्कनीत गेले होते. मात्र, अचानक बाल्कनीचा दरवाजा बाहेरून लॉक झाला आणि दोघेही तिथेच अडकले. घराच्या आत मिहिरचे आई-वडील गाढ झोपेत होते. जर त्यांनी आरडाओरडा केला असता, तर पालकांची झोप मोड झाली असती आणि रात्री उशिरापर्यंत जागल्याबद्दल त्यांना ओरडा पडला असता. याच भीतीने दोघांनी शांत राहण्याचे ठरवले.

विशालकाय पाणगेंड्याला हरणाच्या बाळाने दिलं आव्हान, धावत पळत आला अन्… मजेदार दृश्य पाहून हसूच येईल; Video Viral

डिलिव्हरी ॲपचा असाही वापर!

बाल्कनीत अडकलेल्या मिहिरला अचानक एक कल्पना सुचली. त्याने लगेच आपल्या मोबाईलमधील ‘ब्लिंकिट’ ॲप उघडले आणि काही किरकोळ सामानाची ऑर्डर दिली. त्याचा उद्देश वस्तू मागवणे हा नसून, एका अशा माणसाला घरापर्यंत बोलावणे होता जो बाहेरून येऊन त्यांची मदत करू शकेल. अवघ्या काही मिनिटांतच एक डिलिव्हरी बॉय ऑर्डर घेऊन इमारतीखाली पोहोचला.

डिलिव्हरी बॉयने केली ‘फिल्मी’ सुटका

मिहिरने बाल्कनीतूनच डिलिव्हरी बॉयला इशारा करून आपली अडचण सांगितली. मिहिरने त्याला हळू आवाजात समजावले की, घराचा मुख्य दरवाजा बाहेरून कसा उघडायचा आणि कोणालाही न उठवता त्यांना बाल्कनीतून बाहेर कसे काढायचे. त्या डिलिव्हरी बॉयनेही कमालीची चतुराई दाखवली. त्याने कोणताही आवाज न करता फ्लॅटमध्ये प्रवेश केला आणि बाल्कनीचा दरवाजा उघडून दोन्ही मित्रांची सुटका केली.

सोशल मीडियावर व्हिडिओची धूम

मिहिरने या अनोख्या रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर (@mihteeor) शेअर केला आहे, जो अवघ्या काही तासांत तुफान व्हायरल झाला. यावर ब्लिंकिट कंपनीने स्वतः मजेशीर प्रतिक्रिया देत म्हटले की, “हे फक्त पुण्यातच घडू शकते!” नेटकऱ्यांनीही यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

Yuck! हातावर तंदुरी रोटी घेतली अन् त्यावर थुंकला, कुकचा किळसवाणा Video Viral, पोलिसांनी केली अटक

Web Title: Pune boy stuck in balcony ordered blinkit for rescue viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 08:59 PM

Topics:  

  • Blinkit
  • Pune
  • pune news
  • Pune Viral Video

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “हातात कमळ, विकासाचं व्हिजन”; लहू बालवडकरांच्या प्रचाराला मिळतोय जोरदार प्रतिसाद
1

Maharashtra Politics: “हातात कमळ, विकासाचं व्हिजन”; लहू बालवडकरांच्या प्रचाराला मिळतोय जोरदार प्रतिसाद

BJP अन् RPI च्या उमेदवारांचा गृहभेटीवर भर; भाजपला मतदान करण्याचे केले आवाहन
2

BJP अन् RPI च्या उमेदवारांचा गृहभेटीवर भर; भाजपला मतदान करण्याचे केले आवाहन

Pune News: “मी स्वतः एक दुकानदार, त्यामुळे…”; उमेदवार सुधीर वाघमोडेंनी व्यक्त केले मत
3

Pune News: “मी स्वतः एक दुकानदार, त्यामुळे…”; उमेदवार सुधीर वाघमोडेंनी व्यक्त केले मत

PMC Election 2026: पुण्यात भाजपला धक्का; वसंत अमराळे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
4

PMC Election 2026: पुण्यात भाजपला धक्का; वसंत अमराळे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.