Pune News: स्वतःच रचला बेपत्ता होण्याचा बनाव; 4 दिवस लपून बसला अन्..., सिंहगड प्रकरणात 'हा' धक्कादायक खुलासा
Sinhgad Fort News: चार दिवसांपूर्वी पुण्यातील प्रसिद्ध अशा किल्ले सिंहगडावर एक तरूण बेपत्ता झाला होता. फिरण्यासाठी आलेला हा तरुण लघुशंकेसाठी जातो असे सांगून गेला तो परत आलाच नाही. मात्र अखेर चार दिवसांच्या तपासानंतर तो तरूण पोलिसांच्या हाती लागला आहे. मध्यंतरी या प्रकरणात एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले होते. मात्र अखेर हा तरूण सापडला आहे. हा तरूण नक्की कुठे होता आणि कशासाठी लपला होता याबाबत अधिक जाणून घेऊयात.
सिंहगड किल्ल्यावरून गायब झालेल्या या तरुणाचा शोध पोलिसानी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे लावला आहे. हा तरूण सापडल्यानंतर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान तरुणाने किल्ल्यावरून बेपत्ता होण्याचा बनाव रचला आहे, असे समोर आले आहे. त्यामुळे या घटनेला नवीनच वळण मिळाले आहे.
या तरूणावर कर्जाचा डोंगर असल्याने हा तरूण बेपत्ता झाला होता. या कर्जाच्या विषयापासून वाचण्यासाठी या तरुणाने बेपत्ता होण्याचा बनाव रचल्याचे समोर आले आहे. त्यामुळे इतके दिवस हा तरूण जिवंत आहे की कुठे तानाजी कड्यावरून कोसळला याचा शोध लागला आहे. दरम्यान त्यातच एक फुटेज समोर आले होते त्यामुळे या तरूणासोबत काही घातपात झाला का असा संशय पोलिसांना होता. मात्र आता हा तरूण सापडला असल्याने तो नक्की कोणत्या कारणासाठी लपला होता हे अधिक स्पष्टपणे समोर येणार आहे.
CCTV फुटेजमुळे निर्माण झालेला ट्विस्ट
सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय?
काही दिवसांपूर्वी एक तरूण आपल्या मित्रांसाह किल्ले सिंहगडावर फिरण्यासाठी आला होता. त्यानंतर तो बेपत्ता झाला होता. तो खरेच कड्यावरून कोसळला आहे की त्याच्यासोबत घातपात झाला आहे असा संशय निर्माण झाला होता. याला कारण म्हणजे समोर आलेले सीसीटीव्ही फुटेज.
नेमके काय घडले? |
हैदराबादवरुन आलेला तरूण आपल्या मित्रांसाह किल्ले सिंहगड फिरण्यासाठी आले होते. त्यावेळेस त्या तरुणाने आपल्या मित्रांना मी लघुशंकेला जाऊन येतो असे सांगितले. खूप वेळ तो न आल्याने मित्रांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्या परिसरात मित्रांना त्याची चप्पल सापडली. त्यामुळे त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. तो तरूण तानाजी कड्यावरून कोसळला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असतानाच समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजने आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले होते. मात्र त्याच फुटेजच्या आधारे पोलिसांनी या तरुणाला शोधून काढले आहे.