Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणेकरांसाठी खुशखबर! लवकरच ‘या’ मेट्रो मार्गांचे काम सुरू होणार, काय म्हणाले Murlidhar Mohol?

पुणे शहर आणि परिसरातील विविध विकासकामे आणि प्रकल्पांसंदर्भात मोहोळ यांनी सोमवारी प्रशासनाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर बैठक घेऊन आढावा घेतला.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 03, 2026 | 07:51 PM
पुणेकरांसाठी खुशखबर! लवकरच ‘या’ मेट्रो मार्गांचे काम सुरू होणार, काय म्हणाले Murlidhar Mohol?
Follow Us
Follow Us:

पुणे शहरातील विकासप्रकल्पांना गती देण्याचे मोहोळांचे निर्देश
पुणे मेट्रो लोहगाव एअरपोर्टला जोडण्यासाठी प्रयत्न 
शहरातील प्रदूषणावर उपाययोजना करण्याचे निर्देश

पुणे: ‘लोहगाव येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रोने जोडला जाणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न केले जात होते. सहा विविध मार्गांवर चर्चा होऊन त्यातील व्यावहारिक मार्ग अंतिम करण्यात आला आहे. त्यामुळे आता विमानतळ थेट मेट्रो मार्गाने जोडला जाईल, अशी माहिती पुण्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.  तसेच खडकवासला ते हिंजवडी या मेट्रो मार्गासाठी विस्तृत प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या असल्याचेही मोहोळ यांनी नमूद केले.

शहर आणि परिसरातील विविध विकासकामे आणि प्रकल्पांसंदर्भात मोहोळ यांनी सोमवारी प्रशासनाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर बैठक घेऊन आढावा घेतला. विकासप्रकल्प कालबद्ध वेळेत आणि दर्जेदारपणे पूर्ण करावेत, अशा सूचनाही केल्या. या बैठकीत पुणे शहराच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या  १६ विकासप्रकल्प आणि कामांसंदर्भात चर्चा करण्यात आली. त्याबाबत मोहोळ यांनी माध्यमांना ही माहिती दिली. वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या मेट्रो मार्गांचे काम लवकरच सुरू होणार आहे.‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून साकारलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे काम ९४ टक्के पूर्ण झाले आहे. या मार्गावरील २३ पैकी १३ स्टेशनचे काम एप्रिलअखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

पुणे शहरातील विकासप्रकल्पांना गती देण्याचे निर्देश… 📍शासकीय विश्रामगृह पुणे शहरातील आणि परिसरातील विविध विकासकामे आणि प्रकल्पांच्या संदर्भात आज प्रशासनाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर बैठक घेऊन आढावा घेतला. विकासप्रकल्प कालबद्ध वेळेत आणि दर्जेदारपणे पूर्ण… pic.twitter.com/vWw547yft1 — Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) March 3, 2026

शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या या बैठकीला महापौर मंजूषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे,  स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे, महामेट्रोचे कार्यकारी संचालक श्रावण हर्डीकर, लोहगाव विमानतळाचे संचालक  संतोष ढोके, हवाई दलाचे अधिकारी तसेच विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Pune Metro: प्रदूषणाशी लढा! मेट्रो प्रवासातून दर किलोमीटरला वाचतोय १०८.५ मिलीग्रॅम $CO_2$

स्मारकांच्या कामांचाही आढावा 

एनडीए (चांदणी) चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्मारक, डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक, बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास, कोथरूड येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कलामंदिर, गदिमा स्मारक, लहुजी वस्ताद साळवे स्मारक आदी कामांचा आढावा घेत ही सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही मोहोळ यांनी प्रशासनाला दिल्या.

Ajit pawar : बारामती विमानतळाला अजित पवार यांचे नाव द्या; कुणी केली मागणी ?

“पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या खंबीर पाठिंब्याने  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम  नेतृत्वाखाली पुण्याच्या सर्वांगीण विकासासााठी विविध पातळ्यांवर विकासकामे व प्रकल्प वेगाने सुरू आहेत. या प्रकल्पांना गती देत ते लवकर पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध  आहे.”

– मुरलीधर मोहोळ, खासदार, केंद्रीय राज्यमंत्री

Web Title: Murlidhar mohol take development meeting for pune city metro line lohgaon airport pollution pune marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 07:40 PM

Topics:  

  • murlidhar mohol
  • Pune Metro
  • pune news

संबंधित बातम्या

चाकण-हिंजवडीतील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी डुडी यांनी अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश
1

चाकण-हिंजवडीतील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी डुडी यांनी अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

पुण्यात पुन्हा पाणी कपातीचे संकट; आठवड्यातून एक दिवस पाणी ठेवणार बंद
2

पुण्यात पुन्हा पाणी कपातीचे संकट; आठवड्यातून एक दिवस पाणी ठेवणार बंद

‘आश्वासन नको, प्रत्यक्ष मदत द्या’; प्रशासनाला शेतकऱ्यांची आर्त हाक
3

‘आश्वासन नको, प्रत्यक्ष मदत द्या’; प्रशासनाला शेतकऱ्यांची आर्त हाक

Pune Teachers Voter List : मतदारयादीत ‘बॉम्बस्फोट’! मतदाराच्या नावाचा ‘बॉम्बस्फोट’ म्हणून उल्लेख, मतदार यादी पाहून सगळेच हैराण
4

Pune Teachers Voter List : मतदारयादीत ‘बॉम्बस्फोट’! मतदाराच्या नावाचा ‘बॉम्बस्फोट’ म्हणून उल्लेख, मतदार यादी पाहून सगळेच हैराण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.